कॅडेट प्रवेश सुविधा कोर्सेसचा लाभ घ्या - जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी

कॅडेट प्रवेश सुविधा कोर्सेसचा लाभ घ्या - जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) - भारतीय नौदल अधिकारी पदावर भरती होण्यासाठी 10+2 (बी-टेक) कॅडेट प्रवेश (पर्मनंट कमिशन) कोर्सेस जानेवारी 2026 पासून सुरु होत आहेत. जिल्ह्यातील तरुण, तरुणींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सर्व एचएससी उत्तीर्ण विद्यार्थी तसेच संबधित पात्र विद्यार्थी, विद्यार्थिनींनी 30 जून पासून Web Site - www.joinindiannavy.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावयाचे आहेत.