HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

MNS - SHIVSENA ALLIANCE : मनसे-शिवसेना युतीवर राऊतांचं मोठं वक्तव्य, “दोन्ही ठाकरे ठरवतील युतीचं भविष्य”

MNS - SHIVSENA ALLIANCE :  मनसे-शिवसेना युतीवर राऊतांचं मोठं वक्तव्य, “दोन्ही ठाकरे ठरवतील युतीचं भविष्य”

माझा महाराष्ट्र ऑनलाईन : गेल्या काही दिवसापासुन राज्यात मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे या दोन पक्षात युती होणार अशा  चर्चा सुरु झाल्या आहेत. भाजपासह महायुतीला राज्यात पर्याय देण्यात येणार अशी चर्चा रंगली होक्षाच्या युतीबाबत मोठे भाष्य केले आहे.

 

 राज ठाकरे यांनी मुलाखत दिली आहे. किंवा राज ठाकरेंनी दुसरी मुलाखत दिली. म्हणून युतीचा विषय चर्चेला आला असेल. उद्धव ठाकरे यांनीही मुलाखतीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुलाखतीवर चर्चा ठरत नाही. एकनाथ शिंदे आणि फडणवीस हे समोर आल्यावर गोड बोलतात. पण तसं नाही ना. मिठ्या मारतील. बाजूला बसतील. एकमेकांकडे बघून नेत्रपल्लवी करतील. पण प्रत्यक्षात तसं चित्र आहे का. तसं चित्र नाही. राज ठाकरे यांच्या तीन मुलाखतीपेक्षा प्रत्यक्षात काय चाललंय हे आम्हाला माहीत आहे. आम्ही स्वत: उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या मनसे बरोबर नातं जोडायला सकारात्मक भूमिका ठेवली आहे. कोण काय बोलतं या पेक्षा ठाकरे काय बोलतात हे महत्त्वाचं आहे, असे राऊत म्हणाले.

राज ठाकरे - उध्दव ठाकरेंवर मराठी जनतेचं प्रेशर 

मनसे युतीसाठी दिलसे भूमिका घेणार असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले. त्याचवेळी मनसे युतीसाठी नात्याची जोड देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे. दोघांवरही मराठी जनतेचं प्रेशर आहे. हे जसं प्रेशर भावनिक आहे, तसं राजकीय आहे. मराठी माणसाला मुंबईवर आपला अधिकार आणि हक्क कायम ठेवायचा असेल तर ईस्ट इंडिया कंपनी सुरत प्रायव्हेट लिमिटेड प्रोपरायटेड बाय अमित शाह, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस आणि वगैरे वगैरे… आणि बाकीचे शेअर होल्डरच्या जबड्यातून मुंबई वाचवायची असेल तर मराठी माणसाला सर्व काही विसरून एकत्र यावं लागेल. मराठी माणसाला ताठ मानाने या मुंबईत जगायचे असेल तर सर्व मतभेद, जळमटं आणि क्लिमिषे बाजूला ठेवून एकत्र यावं लागेल ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे, असे राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरे यांचं मन विशाल आणि मोठं आहे. माझी कालही चर्चा झाली आहे. आपण सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही, असं आमचे पक्षप्रमुख आणि बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांची मनसे आणि दिलसे भूमिका आहे. मराठी माणसाचं अहित होता कामा नये. मराठी माणसाच्या मनातील योजना, इच्छा असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी मागे हटता कामा नये तीच बाळासाहेबांना मानवंदना होती, असे वक्तव्य राऊतांनी केले. 

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.