HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

'अच्छे दिन'मुळे रस्त्यावर चूल थाटण्याची आली वेळ उचगावात वाढत्या महागाईबद्दल शिवसेनेची निदर्शने : मोदी सरकारचा निषेध

'अच्छे दिन'मुळे रस्त्यावर चूल थाटण्याची आली वेळ  उचगावात वाढत्या महागाईबद्दल शिवसेनेची निदर्शने : मोदी सरकारचा निषेध

मुबारक अत्तार:-

घरगुती गॅस सिलेंडची झालेली वारेमाप दरवाढ व वाढत्या महागाईबद्दल मोदी सरकारचा निषेध नोंदवत उचगाव येथे करवीर शिवसेनेने जोरदार निदर्शने केली. महिलांनी चक्क रस्त्यावरच चूल थाटून अच्छे दिनमुळे आलेल्या संकटाचे प्रात्यक्षिक दाखवले.#

अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने गॅस सिलेंडर, इंधनाची केलेली दरवाढ म्हणजे सर्वसामान्य जनतेची केलेली फसवणूक आहे.  हे सरकार सत्तेवर आल्यानंतर सर्वच वस्तू व सेवांची दरवाढ दुप्पट झाली आहे.  आर्थिक उत्पन्नात घट झाली असून बेरोजगारी वाढली आहे. सर्वसामान्य जनांचे कंबरडे मोडणाऱ्या केंद्र शासनाचा शिवसैनिकांनी धिक्कार केला. उचगावच्या मुख्य प्रवेशद्वार परिसरात मोदी सरकारच्या निषेधार्थ तीव्र निदर्शने केली. महिलांनी रस्त्यावर चूल थाटून त्यावर भाकरी थापत व गॅस सिलेंडरला हार घालून बोंब मारून मोदी सरकारचा घोषणा देत निषेध केला. शिवसैनिकांनी गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किंमतीचे  फलक गळ्यामध्ये अडकवलेले होते. करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, विक्रम चौगुले व उचगावचे लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण निदर्शकासमोर बोलताना म्हणाले की जनतेला आता मोदी सरकार चले जाव म्हणण्याची वेळ आली आहे.

   

उपसरपंच विराग करी, उपजिल्हाप्रमुख अवधूत साळोखे, करवीर तालुका प्रमुख विनोद खोत, उपतालुकप्रमुख राहुल गिरूले, युवासेना तालुकाप्रमुख संतोष चौगुले, फेरीवाला संघटनेचे तालुकाध्यक्ष कैलास जाधव यांनी केंद्र सरकारवर टीका केली.  बाळासाहेब नलवडे, अरविंद शिंदे, राहुल मोळे, आनंदा नाईक, विशाल सुर्यवंशी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व ग्रामस्थ निदर्शनामध्ये सहभागी झाले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.