HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

अजित पवारांमुळेच माझा पराभव... 'या' नेत्याने केला आरोप

अजित पवारांमुळेच माझा पराभव... 'या' नेत्याने केला आरोप

मुंबई : कर्जत जामखेडमधील भाजप आमदार प्रा. राम शिंदे यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आता या त्यांच्या पराभवाचं खापर त्यांनी रोहित पवार यांचे काका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्यावर फोडले आहे. माझा पराभव हा नियोजित कट  होता आणि तो अजित पवार यांच्यामुळेच झाला असं शिंदे यांनी म्हटलं आहे. माझ्या पराभवात अजित पवार सामील होते अशी टीकाही त्यांनी केली आहे. 

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी अजित पवार सातारा इथल्या कराड इथं होते. त्यावेळी शरद पवार यांच्याबरोबर आमदार रोहित पवार आले होते. शरद पवार पुढे निघून गेल्यावर तिथं रोहित पवार यांनी मागून आलेल्या अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवार यांनी रोहित पवार यांना पाया पडायला लावून आशीर्वाद लगावला आणि पुढे मिश्किल टिप्पणी केली. म्हणाले, ‘बेट्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर…’, अशी टिप्पणी करताच तिथं जमलेल्यांमध्ये एकच हशा पिकला. रोहित पवार यांची  यावर प्रतिक्रिया देखील आहे. 2019 मध्ये माझ्या विजयात अजितदादांचा मोठा वाटा राहिला आहे. यावेळी ते बारामतीत गुंतून पडले होते. त्यांची कर्जत-जामखेडमध्ये सभा झाली असती, तर उलट-सुलट किंवा माझ्यासाठी अधिक चांगलेच झाले, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, याच वक्तव्याचा अर्थ लावत  भाजपचे प्रा. राम शिंदे यांनी अजित पवार यांच्या भूमिकेवर गंभीर आरोप केले. “कर्जत-जामखेडमध्ये माझा पराभव नियोजित कट होता. राजकीय सारीपाठामध्ये जे घडले त्यांचा मी बळी ठरलो”, असं  राम शिंदे यांनी म्हटलय. 

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.