HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 10 राज्यमार्ग व 48 प्रमुख जिल्हा मार्ग बंद

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 10 राज्यमार्ग व 48 प्रमुख जिल्हा मार्ग बंद

कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 10 राज्य मार्ग व 48 प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण 58 मार्ग बंद झाले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

करवीर- राज्य मार्ग 194 वरील शाहू नाका कळंबे साळोखेनगर, बालिंगे, शिंगणापूर, चिखली, राष्ट्रीय महामार्ग क्र. 204 वडणगे निगवे दुमाला, शिये टोप राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 ला मिळणारा ते एमआयडीसी पूल कसबा बावडा रस्ता रामा 194 वर शिंगणापूर बंधाऱ्यावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद पर्यायी आंबेवाडी, चिखली मार्गे वाहतुक सुरु. तसेच शिये कसबा बावडा रस्त्यावर महानगरपालिका हद्दीत पाणी आल्याने वाहतुक बंद पर्यायी मार्ग शिये फाटा राष्ट्रीय महामार्ग शिरोली नाका, कोल्हापूर मार्गे सुरु.

चंदगड- राज्य मार्ग 189 वरील कोल्हापूर- गारगोटी-गडहिंग्लज- नागणवाडी-चंदगड-हेरे तिलारी रस्ता रामा 189 वर चंदगड पुलावर 2 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद आहे. पर्यायी रामा 189 ते प्रजिमा 76 पाटणे फाटा मार्गे रामा 180 वरुन हलकर्णी फाटा दाटे मार्गे चंदगड मार्गे वाहतुक सुरु आहे. 

गडहिंग्लज- राज्य मार्ग 189 वरील कोल्हापूर- गारगोटी-गडहिंग्लज- नागणवाडी-चंदगड-हेरे तिलारी रस्ता रामा 189 वर भडगाव पुलावर पाणी आल्याने वाहतुक बंद आहे. पर्यायी गिजवणे, बेळगुंदी, इंचनाळ, गजरगाव, महागाव प्रजिमा 83 मार्गे वाहतुक सुरु आहे.

करवीर- रा.मा.189 वर कोल्हापूर गारगोटी गडहिंग्लज नागणवाडी, चंदगड, हेरे, तिलारी रस्ता रामा 189 वर हळदी गावात पाणी आल्याने वाहतूक बंद आहे. पर्यायी कोल्हापूर इस्पुर्ली, शेळेवाडी मार्गे वाहतुक सुरु आहे.

राधानगरी- राज्य मार्ग 178 वर राज्य मार्ग 178 देवगड-राधानगरी-मुरगुड-निपाणी वर मुरगूड जवळ 3 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद आहे. पर्यायी रस्ता मुरगुड चिमगाव मार्गे गारगोटी व कोल्हापूर तसेच निढोरी कागल सुरु आहे.

चंदगड- राज्य मार्ग 201 वर चंदगड-हिंडगाव-इब्राहिमपूर चितळे- आजरा रस्ता रा.मा. 201 वर इब्राहिमपूर पुल (घटप्रभा नदी) किमी 5/600 3 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद आहे. पर्यायी रामा 180 ते कुरणी, गवसे, इब्राहिमपूर, अडकूर प्रजिमा 66 मार्गे वाहतुक सुरु आहे.

आजरा- रा.मा.201 वरील चंदगड, हिंडगाव, इब्राहिमपूर, चितळे, आजरा रस्ता रा.मा. 201 वर उचंगी धरणाचे बॅक वॉटर मधील मोरी व पाणी आल्याने रस्ता बंद आहे. पर्यायी पोहाळे, पोहळवाडी मार्गे बाजारभोगाव मार्गे वाहतुक सुरु आहे.

गगनबावडा- राज्य मार्ग 193 वरील रा.मा. 193 आंबेवाडी, चिखली, वरनगे पाडळी, यवलुज, बाजारभोगाव, अनुस्कुरा मार्गावर कासारी नदीचे 4 फूट पुराचे पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद आहे. पर्यायी पोहाळे, पोहळवाडी मार्गे बाजारभोगाव मार्गे वाहतुक सुरु आहे.

पन्हाळा- राज्य मार्ग 193 वरील रा.मा. 193 आंबेवाडी, चिखली, वरणगे पाडळी, यवलुज, बाजारभोगाव, अनुस्कुरा मार्गावर कासारी नदीचे 5 फूट पुराचे पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद आहे. पर्यायी मलकापूर मार्गे कोल्हापूर वाहतुक सुरु आहे.

करवीर- राज्य मार्ग 193 वरील रा.मा. 193 आंबेवाडी, चिखली, वरनगे पाडळी, यवलुज, बाजारभोगाव, अनुस्कुरा मार्गावर प्रयाग पुलावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद आहे. पर्यायी बालिंगे, खुपिरे, येवलूज, निटवडे, वरणगे, पाडळी मार्गे वाहतुक सुरु आहे.

शिरोळ- राज्य मार्ग 195 वर रा.मा.क्र. 178 पासून निढोरी, गोरंबे, कागल , सांगाव, यळगुड, रेंदाळ, रांगोळी, हेरवाड रा.मा. क्र. 153 ला मिळणारा राज्य मार्ग क्र. 195 वर 4 फुट पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्ग हेरवाड, पाचवा मैल मार्गे वाहतुक सुरु आहे. 

हातकणंगले- राज्य मार्ग 195 वर रा.मा.क्र. 178 पासून निढोरी, गोरंबे, कागल , सांगाव, यळगुड, रेंदाळ, रांगोळी, हेरवाड रा.मा. क्र. 153 ला मिळणारा राज्य मार्ग क्र. 195 वर 1 फुट पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद आहे. पर्यायी रेंदाळ, हुपरी, पट्टणकोडोली, रुई मार्गे वाहतुक सुरु आहे.

करवीर- राज्यु मार्ग 194 A वर राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 जाजल पेट्रोल पासून कणेरी, गिरगाव ते राज्यमागर्ग क्र. 196 नंदवाळ, रामा 189 वाशी, महे, कोगे, कुडीत्रे फॅक्टरी रामा 177 वाकरे फाटा, खुपीरे, यवलुज, वरणगे, केर्ली, निगवे, टोप, नागाव, मौजे वडगांव, हेर्ले प्ररामा 6 (रा.म.मा.166) रुकडी फाटा, रुकडी बंधारा, चिंचवाड, वसगडे, सांगवडे, हलसवडे, विकासवाडी ते राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 जाजल पेट्रोल पंपाजवळ मिळणारा रस्ता रा.मा. 194 अ वर कुडीत्रे, कोगे पुलावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद आहे. पर्यायी कोगे फाटा, बालिंगे, कुडीत्रे मार्गे वाहतुक सुरु आहे.

हातकणंगले- राज्य मार्ग 192 वर पन्हाळा, वाघबीळ, बोरपाडळे, वाठार तर्फे वडगाव, हातकणंगले, इचलकरंजी, शिरदवाड, शिवनाकवाडी राज्य हद्दीपर्यंतचा राज्य मार्ग क्र. 192 वर पंचगंगा नदीवरील लहान पुलावरुन पाणी वाहत असल्याने लहान पुलावरुन वाहतुक बंद करण्यात आली आहे. पर्यायी इचलकरंजी, कबनुर, रुई, पट्टणकोडोली, हुपरी मार्गे वाहतुक सुरु आहे.

हातकणंगले- राज्य मार्ग 192 वर पन्हाळा, वाघबीळ, बोरपाडळे, वाठार तर्फे वडगाव, हातकणंगले, इचलकरंजी, शिरदवाड, शिवनाकवाडी राज्य हद्दीपर्यंतचा राज्य मार्ग क्र. 192 वर यशदा पूल बाह्य वळण रस्त्यावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद असून पर्यायी इचलकरंजी, कबनुर, रुई, पट्टणकोडोली, हुपरी मार्गे वाहतुक सुरु आहे.

शिरोळ- राज्य मार्ग 200 वरील प्र.रा.मा. 6 पासून अतिग्रे, कबनूर, इचलकरंजी, टाकवडे, शिरढोण, मजरेवाडी, अकिवाट, टाकळी, खिद्रापूर ते जिल्हा हद्द रा.मा. 200 वर शिरढोण पुलावर 4.5 फुट पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला असून पर्यायी इचलकरंजी, यड्राव, नांदणी, शिरोळ, कुरुंदवाड मार्गे वाहतुक सुरु आहे.

चंदगड- राज्य मार्ग 180 वरील जिल्हा हद्दीपासून शिरगांव, नागनवाडी, मजरे, तडशिनहाळ, बेळगांव राज्य हद्दीपर्यंत राज्य मार्ग क्र. 180 वर (दाटे गावाजवळ) अंदाजित 1 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद असून पर्यायी रामा 180 ते तांबूळवाडी, बगीलगे, माणगांव इजिमा 191 ते सोनारवाडी, आमनोळी ते रामा 189 मार्गे वाहतुक सुरु आहे.

प्रमुख जिल्हा मार्ग- 

शिरोळ- प्रजिमा 123 वर चिंचवाड, शिरोळ, कुरुंदवाड, बस्तवाड, अकीवाट, खिद्रापूर रस्ता प्रजिमा 123 वर शिरोळ केटीवेयर वर 7 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद पर्यायी कुरुंदवाड, शिरोळ रामा 153 मार्गे वाहतुक सुरु करण्यात आली आहे.

शिरोळ- प्रजिमा 123 वर चिंचवाड, शिरोळ, कुरुंदवाड, बस्तवाड, अकीवाट, खिद्रापूर रस्ता प्रजिमा 123 वर अनवटी ओढ्यावर 7 फूट पाणी आल्याने रस्ता बंद पर्यायी कुरुंदवाड, शिरोळ रा.मा. 153 मार्गे वाहतुक सुरु करण्यात आली आहे.

शिरोळ- प्रजिमा 123 वर चिंचवाड, शिरोळ, कुरुंदवाड, बस्तवाड, अकीवाट, खिद्रापूर रस्ता प्रजिमा 123 वर बस्तवाड ओढ्यावर 3 फूट पाणी आल्याने रस्ता बंद पर्यायी कुरुंदवाड मार्गे वाहतुक सुरु करण्यात आली आहे.

शिरोळ- प्रजिमा 105 वर प्ररामा 6 पासून जयसिंगपूर, नांदणी, शिरढोण ते अब्दुललाट रस्ता प्रजिमा 105 वर पाणी आल्याने रस्ता बंद पर्यायी नांदणी, हरोली, जांभळी, टाकवडे मार्गे वाहतुक सुरु करण्यात आली आहे.

शिरोळ- प्रजिमा 92 वरील रामा क्र. 200 (मजरेवाडी) श्री गुरुदत्त साखर कारखाना ते टाकळीवाडी, घोसरवाड, काळम्मावाडी वसाहत, घोसरवाड नदी पानवठा ते कर्नाटक राज्य हद्दीपर्यंत रस्ता प्रजिमा 92 वर 5 फुट पाणी आल्याने रस्ता बंद पर्यायी मार्ग नाही.

 शिरोळ- प्रजिमा 31 वरील रामा 200 पासून कबनुर, गंगानगर, सा.का. शहापूर, यड्राव सुतगिरणी, जांभळी, हरोली, नांदणी, धरणगुत्ती ते शिरोळ रा.मा. क्र.153 ला मिळणारा प्रजिमा क्र. 31 वर 3 फुट पाणी आल्याने रस्ता बंद पर्यायी नांदणी, जयसिंगपूर, शिरोळ मार्गे वाहतुक सुरु आहे.

शिरोळ- प्रजिमा 31 वरील रामा 200 पासून कबनुर, गंगानगर, सा.का. शहापूर, यड्राव सुतगिरणी, जांभळी, हरोली, नांदणी, धरणगुत्ती ते शिरोळ रा.मा. क्र.153 ला मिळणारा प्रजिमा क्र. 31 वर 5 फुट पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद पर्यायी नांदणी, जयसिंगपूर, शिरोळ मार्गे वाहतुक सुरु आहे.

शिरोळ- प्रजिमा 73 वरील रा.मा. 153 पासून कुरुंदवाड, नांदणी ते प्ररामा 6 ला मिळणारा रस्ता प्र.जि.मा 73 वर 2.5 फूट पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद असून पर्यायी कुरुंदवाड, शिरोळ, जयसिंगपूर, नांदणी मार्गे वाहतुक सुरु आहे.

हातकणंगले- प्रजिमा 109 वरील वडगांव, लाटवडे, भेंडवडे, खोची ते दुधगांव, आष्टा जिल्हा हद्द रस्ता प्रजिमा क्र. 109 वर रस्त्यावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद असून पर्यायी भेंडवडे, लाटवडे, भादोले, आष्टा मार्गे वाहतुक सुरु आहे.

हातकणंगले- प्रजिमा 96 वरील जिल्हा हद्द निलेवाडी, जुने पारगांव, नवे पारगांव, पाडळी, अंबप, वडगांव, तासगांव, मौजे वडगांव ते रामा क्र. 194 रस्ता प्रजिमा 96 वरील वारणा नदी पुलावर पाणी आल्याने वाहतुक बंद असून पर्यायी अमृत नगर, चिकुर्डे मार्गे वाहतुक सुरु आहे.

आजरा- प्रजिमा 58 वरील प्रजिमा 52 पासून नवले, देवकाडगांव, कोरीवडे, पेरनोली, साळगाव रामा क्र. 188 ला मिळणारा प्रजिमा क्र. 58 वर साळगाव बंधाऱ्यावर पाणी आल्याने वाहतुक बंद असून पर्यायी सोहळे, बाची मार्गे वाहतुक सुरु आहे.

करवीर- प्रजिमा 37 वरील प्रजिमा क्र .29 पासून शिरोली दुमाला, बाचणी, सडोली, खा. हळदी, कुर्डू, इस्पुर्ली, नांगाव, नंदगांव, एकोंडी, व्हन्नूर ते रामा क्र. 195 ला पिंपळगांव नजिक मिळणारा प्रजिमा क्र. 37 वर बाचणी बंधारा पाण्याखाली गेल्याने वाहतुक बंद पर्यायी बाचणी, सडोली खालसा, हळदी मार्गे वाहतुक सुरु आहे.

करवीर- प्रजिमा 29 वरील रामा क्र. 193 यवलुज, दोनवडे ते रामा 177 पुढे बालिंगे, महेपाटी, बीड, शिरोली, सडोली दुमाला, चाफोडी, गरजण, कोते, चांदे, धामोड, शिरगाव, तारळे खु, पडळी, कारिवडे, ओलवन, तारळे खुर्द, कसबा तारळे, पिरळ, पडळी मार्गावरील क// बीड व महे पुलावर पाणी आल्याने वाहतुक बंद पर्यायी बालिंगे, कुंभी, कारखाना, सांगरुळ, महारुळ, बीडशेड मार्गे वाहतुक सुरु आहे.

करवीर- प्रजिमा 42 वरील चांदे, घुंगुरवाडी, हसुर, येवती पाटी, वडकशिवाले, बाचणी साके प्रजिमा 42 वर पाणी आल्याने बाचणी धरणावर पाणी आल्याने रस्ता बंद पर्यायी इस्पुर्ली, नागाव, नंदगाव, खेबवडे, बाचणी, साके मार्गे वाहतुक सुरु आहे.

करवीर- प्रजिमा 42 वरील चांदे, घुंगुरवाडी, हसुर, येवती पाटी, वडकशिवाले, बाचणी, साके प्रजिमा 42 वरील हसुर कुरुकली रस्त्यावर पुलाच्या जोड रस्तयावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद असून पर्यायी मार्ग हसुर, सडोली, हळदी मार्गे वाहतुक सुरु आहे.

गडहिंग्लज- प्रजिमा 86 रा.मा. 188 ते निलजी, नूल, प्रजिमा 56 ते प्रजिमा 57 पासून येणेचवंडी, नंदनवाड, रा.मा. 201 ला मिळणारा प्रजिमा 86 वर बंधाऱ्यावर 1 फूट पुराचे पाणी आल्याने बॅरीकेटींग लावून वाहतुक बंद असून पर्यायी जराळी, दुंडगे प्रजिमा 80 मार्गे वाहतुक सुरु आहे.

कागल- प्रजिमा 46 वर प्र. 43 बिद्री, सोनाळी, सावर्डे बु., सावर्डे खु., केनवडे, गोरंबे, आनुर, बस्तवडे ते रामा क्र. 178 ते हमीदवाडा, नंद्याळ ते प्र. 54 ला मिळणारा प्रजिमा क्र . 46 वर वेदगंगा नदीचे साखळी क्र. 18/600 3 फूट आल्याने पाणी रस्त्यावर रस्ता बंद पर्यायी राज्य मार्ग 178 राधानगरी, मुरगुड, निपाणी रस्त्यावरुन चालू व राज्य मार्ग 195 निढोरी, गोरंबे, कागल मार्गे वाहतुक सुरु आहे.

कागल- प्रजिमा 47 वरील रामा क्र. 178 सोनगे, बस्तवडे, कौलगे, चिखली, खा. कुर्ली राज्य हद्द प्र.क्र. 47 वरील कर्नाटक हद्दीतील वेदगंगा नदीचे पाणी पुलावर 4 फूट पाणी आल्याने रस्ता बंद पर्यायी मार्ग इस्पुर्ली नागाव, नंदगाव, खेबवडे, बाचणी साके मार्गे सुरु करण्यात आली आहे.

कागल- प्रजिमा 47 रामा क्र. 178 सोनगे, बस्तवडे, कौलगे, चिखली खा. कुर्ली राज्य हद्द प्र.क्र. 47 वर कर्नाटक हद्दीतील वेदगंगा नदीचे 4 फुट पाणी पुलावर आल्याने रस्ता बंद असून पर्यायी इस्पुर्ली, नागा

व, नंदगाव, खेबवडे, बाचणी, साके मार्गे वाहतुक सुरु आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.