आजरा तालुक्यात सर्वाधिक पाऊस
कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात काल दिवसभरात आजरा तालुक्यात सर्वाधिक 64.8 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे - हातकणंगले- 1 मिमी, शिरोळ -0.5 मिमी, पन्हाळा- 13 मिमी, शाहुवाडी- 19.6 मिमी, राधानगरी- 40.6 मिमी, गगनबावडा- 63.8 मिमी, करवीर- 3.6 मिमी, कागल- 6.3 मिमी, गडहिंग्लज- 17.8 मिमी, भुदरगड- 55 मिमी, आजरा- 64.8 मिमी, चंदगड- 58.9 मिमी, असा एकूण 22.2 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.