मौजे नांदारी येथील तलावात पडून गव्याचा मृत्यू

मौजे नांदारी येथील तलावात पडून गव्याचा मृत्यू

शाहूवाडी प्रतिनिधी रंगराज कांबळे 

आज मौजे नांदारी जंगल कक्ष क्रमांक 946 मध्ये सुमारे बाराच्या सुमारास नांदारी तलाव क्षेत्रामध्ये रान गवा रात्रीच्या वेळेस पाणी पिण्यासाठी गेला असता पाण्यामध्ये पडून सदर गव्याचा मृत्यू झाला आहे सदर मृत झालेल्या गव्याची बातमी मिळताच वन कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन सदर मृत गव्याला पाण्यातून बाहेर काढून पशुवैद्यकीय अधिकारी शाहूवाडी यांच्याकडून शिवविच्छेदन करून घेऊन सदरच्या गवव्याला दहन करून दफन केले सदर गव्याची पूर्ण वाढ झाली असून तो नर या जातीचा होता सदर मृदगव्याची पाहणी केली असता त्याच्या शरीरावरती कोणत्याही मारहाणीच्या जखमा किंवा मारहाण झालेल्या खुणा आढळून आले नाहीत त्यामुळे सदरचा गवा पाण्यात पडूनच मृत झाला असावा असे वनाधिकाऱ्यांचे मत आहे सदरची कार्यवाही माननीय उपवन संरक्षक कोल्हापूर गुरुप्रसाद साहेब सहायक वनसंरक्षक श्री नवनाथ कांबळे परिक्षेत्र वनाधिकारी आर एस सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ वनाधिकारी आरएस रसाळ वनरक्षक नांदगाव अतुल कदम वनसेवक राजाराम काटकर बंडा बुक्कम दिनकर पाटील राजाराम राऊत सुरेश बुक्कंम आदी उपस्थित होते