जिद्द बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

जिद्द बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

कागल प्रतिनिधी - सुभाष भोसले 

जिद्द बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष व लोकराज्यचे बांधकाम कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष राजेंद्र सुतार यांच्या नेतृत्वाखालील कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे.ज्येष्ठ नागरिकांना १०,००० रु.पेन्शन मिळावी,बांधकाम कामगारांना विविध लाभ मिळावेत, गायराण जागेतील गरिबांची अतिक्रमण कायम करावीत आदी मागण्यासाठी हे उपोषण सुरू आहे.

यावेळी लोकराज्य जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल चव्हाण, आणि नागरीक उपस्थित होते.