आंतर महाविद्यालयीन अॅथलेटिक्समध्ये कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचा ठसा : डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन अॅथलेटिक्स स्पर्धा

आंतर महाविद्यालयीन अॅथलेटिक्समध्ये कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचा ठसा : डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन अॅथलेटिक्स स्पर्धा

कोल्हापूर प्रतिनिधी : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन अॅथलेटिक्स स्पर्धा शिवाजी विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकवर संपन्न झाल्या. या स्पर्धेत विविध प्रकारांमध्ये कॉलेज ऑफ फिजोथेरपीच्या विद्यार्थ्यानी यश मिळवत स्पर्धेवर ठसा उमटवला. एकूण 89 स्पर्धक सहभागी झाले होते.

स्पर्धेचे उद्घाटन डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठच्या सेंटर फॉर इंटर डिसिपिलिनरी रिसर्चच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. अर्पिता पांडे-तिवारी यांच्या हस्ते झाले. यावेळी क्रीडा संचालक शंकर गोनुगडे, डॉ. आय. एच. मुल्ला, एन. आर. कांबळे, डॉ. निलेश पाटील, सुशांत कायपुरे, सचिन पाटील, उत्तम मेंगणे, ज्ञानेश्वर भगत, ऋषिकेश कुंभार उपस्थित होते. 

 स्पर्धेत 100 मी.धावणे प्रकारात मुलांमध्ये स्कूल ऑफ हॉस्पीटॅलिटीच्या प्रणव विनोद आंबलेने प्रथम, नर्सिंग कॉलेजच्या आदिशेष राजेश खारकरने द्वितीय तर मुलींमध्ये कॉलेज ऑफ फिजीओथेरपीच्या श्रावणी अशोक जगटेने प्रथम, स्कूल ऑफ अलाईड हेल्थ सायन्सच्या पल्लवी यादवने द्वितीय क्रमांक मिळवला.

मुलांच्या 200 मी धावणे प्रकारात स्कूल ऑफ हॉस्पीटॅलिटीच्या प्रणव विनोद आंबलेने प्रथम, स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंटच्या सोहम राजेश शिंदेने द्वितीय तर मुलीमध्ये कॉलेज ऑफ फिजीओथेरपीच्या श्रावणी अशोक जगटेने प्रथम व कॉलेज ऑफ नर्सिंगच्या वेदांतरी विजय पानारीने द्वितीय स्थान मिळवले.

मुलांच्या 400 मी धावणे प्रकारत कॉलेज ऑफ नर्सिंगच्या श्रीनिकेतन आबासाहेब मुडदुंगेने प्रथम, कॉलेज ऑफ फिजोओथेरपीच्या अभिषेक नंदकुमार कारंडेने द्वितीय क्रमांक तर मुलींमध्ये कॉलेज ऑफ नर्सिंगच्या नमिता नारायण करेकरने प्रथम व याच महाविद्यालयाच्या चंद्रभागा ज्योतिबा एकलने द्वितीय क्रमांक मिळवला.

लांब उडी प्रकारात मुलांमध्ये स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटच्या पवन अशोक पाटीलने प्रथम, कॉलेज ऑफ नर्सिंगच्या श्रीराम मदन गायकवाडने द्वितीय तर मुलीमध्ये कॉलेज ऑफ फिजीओथेरपीच्या सुप्रिया दादासाहेब पिंजारीने प्रथम व स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनॅजमेण्टच्या सानिका प्रभाकर शिंदे हिने द्वितीय क्रमांक मिळवला.

थाळीफेकमध्ये मुलांच्या गटात स्कूल ऑफ इंजिनिरिंग अँड मॅनेजमेंटच्या वरदराज सचिन जाधवने प्रथम, कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्रतीक शामूवेल काळेने द्वितीय तर मुलींमध्ये कॉलेज ऑफ फिजीओथेरपीच्या निकिता रामचंद्र नाईकने प्रथम, मेडिकल कॉलेजच्या राजनंदिनी जगदीश निंबाळकर यांनी द्वितीय स्थान मिळवले.

मुलांच्या गटात गोळाफेकमध्ये मेडिकल कॉलेजच्या वेदांत मेघनाथ केसरकरने प्रथम, कॉलेज ऑफ फिजोओथेरपीच्या ओम सुधीर पाटीलने द्वितीय तर मुलींमध्ये कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या निकिता रामचंद्र नाईक हिने प्रथम व याच कॉलेजच्या स्नेहा गणेश पाटील यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.  

4x100 मी. रिले स्पर्धेत मुलांमध्ये डी वाय पाटील मेडिकल कॉलेज प्रथम, स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट द्वितीय तर मुलीमध्ये कॉलेज ऑफ फिजिओथेरपी प्रथम, कॉलेज ऑफ नर्सिंग द्वितीय क्रमांक पटकावले.

कुलपती डॉ. संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.