महाव्दार रोडवरील पत्त्याच्या जुगार खेळावर छापा ; 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) - पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, यांनी सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील अवैद्य व्यवसायाची माहिती काढुन परीणाम कारक कारवाई करुन अवैद्य व्यवसायाचे समुळ उच्चाटन करणेचे उद्देश्याने जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सुचना दिल्या. दिलेल्या सूचनांप्रमाणे स्थानी गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने महाव्दार रोडवरील पत्त्याच्या जुगार खेळावर छापा टाकून 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
महाद्वार रोडला लागून असलेला जिरगे बोळामध्ये असलेल्या तीन मजली बंदिस्त इमारतीमध्ये करवीर कला क्रिडा सांस्कृतीक मंडळ कोल्हापूर या नावाखाली बेकायदेशीर पैसे लावून पानाचा जुगार सुरू आहे अशी माहिती पथकाला मिळाली.
सदर माहितीचे अनुषंगाने पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उप निरीक्षक संतोष गळवे, शेष मोरे व पोलीस अंमलदार यांचे पथकाने जावून जिरगे बोळ, महाव्दार रोड, कोल्हापूर येथे करवीर कला क्रिडा सांस्कृतीक मंडळ नावाचे बंदीस्त खोलीत पत्याचे पानाचा चालू असले जुगार खेळावर छापा टाकला असता सदर ठिकाणी इसम नामे 1) विलास हंबीरराव सरनाईक वय 66 रा.घर नं 193, ए वॉर्ड शिवाजी पेठ, कोल्हापूर हे क्लबचे मालक असून त्यांनी इसम नामे 2) अय्यज फकीर रा. जवाहरनगर कोल्हापूर यास सदरचा क्लब चालविणेस दिला आहे. तसेच इमस नामे 3) प्रकाश गोपाळ जाधव वय 58 रा हनुमान तालीम जवळ, भैरवनाथ गल्ली, मोरेवाडी, कोल्हापूर, 4) भारत नामदेव मोरे वय 48 रा. हनुमान तालीम जवळ, भैरवनाथ गल्ली, मोरेवाडी, कोल्हापूर, 5) नितीन बाबुराव गवळी, वय 40, रा. म्हसोबा मंदिर शेजारी शिंगणापूर रोड, चंबूखडी, ता करवीर, कोल्हापूर, 6) दत्तात्रय रामचंद्र कोईगडे वय 44, रा. भैरवनाथ गल्ली, मोरेवाडी, कोल्हापूर, 7) अमृत बाळासाहेब पाटील वय 40, रा. फिरंगाई तालीम शेजारी शिवाजी पेठ, कोल्हापूर, 8) गजानन गोविंद केळसकर वय 28, रा. दिनकर जांभळे यांच्या घरी भाडयाने, मंगळवार पेठ, राम गल्ली, कोल्हापूर, 9) वसंत धर्मा शिंदे वय 56, रा. यादवनगर, डवरी वसाहत, कोल्हापूर, 10) महेश शिवाजी माने वय 50, रा. घर नं 2078 राजारामपुरी 14 वी गल्ली कोल्हापूर, 11) रियाज रफिक शेख वय 42 रा जवाहरनगर, सरनाईक वसाहत, कोल्हापूर, 12) उत्तम महादेव शेणवे वय 42, रा. प्लॉट नं 23/24 भारती नगर, मोरेवाडी, कोल्हापूर, 13) उदय शांतीलाल शहा वय 70, रा. घर नं 1025 सोमवाप पेठ, कागल, कोल्हापूर, 14) प्रकाश दत्तात्रय पाटील वय 54, रा. मु पो पाडळी खुर्द, ता करवीर, कोल्हापूर, 15) भगवान गोविंद धुरी वय 56, रा. मु पो शिरसे, भोगवाती, ता राधानगरी कोल्हापूर, 16) कुणाल सुरेश आब्रे व.व.28, रा. राजेंद्रनगर, दत्ता मिसाळ गल्ली, कोल्हापूर 17) जोतिराम शामराव जाधव व.व.51, रा. पुरग्रस्त कॉलनी, शिंगणापूर, ता. करवीर, जि. कोल्हापूर 18) दिगंबर मारूती नरके व.व.39, रा. हणमंतवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर 19) अजिंक्य काकाजी जौंजाळे व.व.29, रा. मिसाळ गल्ली, राजेंद्रनगर, कोल्हापूर 20) आनंदा दादु रावण व.व.65, रा. रायगड कॉलनी, पाचगांव, ता. करवीर, जि. कोल्हापूर 21) रोहीत सुरेश आवळे व.व.32, रा. साईमंदीर जवळ, सुभाषनगर, कोल्हापूर 22) सुनिल आबासाहेब कांबळे व.व.52, रा. दौलतनगर, कोल्हापूर 23) अमित धोंडीराम भोसले व.व.45, रा. सायबर चौक, काटकर माळ, कोल्हापूर 24) रफिक हुसेन सनदी व.व.55, रा. राजलक्ष्मीनगर, देवकर पाणंद, कोल्हापूर 25) शंकर बाबुराव जाधव व.व.49, रा. जुना वाशी नाका, कोल्हापूर 26) युवराज दिगंबर राबाडे व.व.48, रा. धोत्री गल्ली, गंगावेश, कोल्हापूर 27) संकेत हेमंत नाखरे व.व.38, रा. पन्हाळा, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर 28) राजेंद्र काशिनाथ आडसुळे व.व.58, रा. शनिवार पेठ, कोल्हापूर 29) शरद आत्माराम वडर व. व. 46, रा. माणगांव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर 30) धनाजी कृष्णात चुयेकर व.व. 49, रा. वाशी, ता. करवीर, जि. कोल्हापूर 31) परशुराम पांडुरंग गाडीवडर व.व.52, रा. सरनाईक कॉलनी, शिवाजी पेठ, कोल्हापूर 32) संभाजी गणपतराव गोंदकर व.व.62, रा. सोमवार पेठ, कोल्हापूर 33) गंगाराम जयराम गोसावी व.व.46, रा. वडणगे, ता. करवीर, जि. कोल्हापूर 34) राजेंद्र तुकाराम गुंडप व.व.60, रा. बुधवार पेठ, कोल्हापूर 35) सतिश अशोक संकपाळ वय 35 रा. मेनरोड माळवाडी शिंगणापुर ता. करवीर जि. कोल्हापूर 36) संतोष श्रीमंत सिध्द वय 40 रा. 1205 ए वॉर्ड, सासणे कॉलनी, लक्षतिर्थ वसाहत, कोल्हापूर 37) राजु आप्पालाल मुजावर वय 63 रा.949 डी वॉर्ड, जोशी गल्ली, शुक्रवार पेठ कोल्हापूर 38) आनंद हणमंत काळे वय 50 रा. 970 डी वॉर्ड शुक्रवार पेठ कोल्हापूर 39) दिपक गणपती पाटील वय 42 रा. शांतीनिकेत मागे, मोरेवाडी ता. करवीर जि. कोल्हापूर 40) विजय गोविंद आडसुळे वय 47 रा.634 ए वॉर्ड, लक्षतिर्थ वसाहत, कोल्हापूर 41) शिवाजी दत्तात्रय शिवलंगन वय 58 रा. मुळ रा. धामोड Ⅱ. राधानगरी जि. कोल्हापूर सध्या रा. गगनगिरी मित्र मंडळ जवळ, भोसलेवाडी कोल्हापूर 42) सर्जेराव सिताराम पाटील वय 53 रा. खपिरे ता. करवीर जि. कोल्हापूर 43) राजा भागोजी शेळके वय 30 रा.56/2 लक्ष्मी नारायण कॉलनी, फुलेवाडी रिंगरोड कोल्हापूर 44) तौफिक मुबारक अत्तार वय 45 रा.2085 डी वॉर्ड, शुक्रवार पेठ कोल्हापूर 45) संदिप मधुकर रामाणे वय 42 रा. सातार्डे ता. पन्हाळा जि. कोल्हापूर 46) अमर तायाप्पा कांबळे व.व.50, रा. शिंगणापूर ता करवीर कोल्हापूर 47) सर्जेराव सदाशिव कुरणे वय 50 रा. मु पो कळे ता पन्हाळा कोल्हापूर हे पत्याचे पानाने रम्मी जुगार खेळ खेळत असताना मिळुन आले असून इसम नामे 48) राजाराम रामचंद्र हराळे, वय 50 रा घर नं 333, हराळे गल्ली, शिवाजी पेठ, कोल्हापूर 49) सुनिल शंकर शिंदे व.व.42, रा. जोशी गल्ली, शुक्रवार पेठ, कोल्हापूर 50) अभिजित दत्तात्रय संकपाळ वय 33 रा. मावळा चौक, कणेरीवाडा ता. करवीर जि. कोल्हापूर 51) प्रसाद बाळकृष्ण बोडके व.व. 44, रा. 968, ए वार्डे, शिवाजी पेठ, कोल्हापूर 52) प्रमोद नारायण जाधव व.व.48, रा. रंकाळा स्टेट बँकेजवल, कोल्हापूर 53) उदय राजाराम चव्हाण व.व. 70, रा. शाहु बैंक, चौक, मंगळवार पेठ कोल्हापूर 54) विकास दिपक यादव वय 46 रा. प्लॉट नं 71/72 दत्तनगर शिंगणापुर रोड, कोल्हापुर 55) नारायण केरबा माळी वय 50 रा.7668 ई वॉर्ड, सदरदार तालीम जवळ, शिवाजीपेठ कोल्हापूर 56) महादेव नकुला चव्हाण वय 29 रा. कांटे ता. शाहुवाडी जि. कोल्हापूर 57) केरबा बापु शिंदे वय 50 रा. महे ता. करवीर जि. कोल्हापूर 58) संदिप केरबा कांबळे वय 29 रा. भिमनगर वाशि ता. करवीर जि. कोल्हापूर हे सदर क्लबमध्ये कामगार म्हणुन मिळुन आले आहेत.
या कारवाईत 99,531/- रु. रोख रक्कम, 45 मोबाईल हँन्डसेट, 2 मोटर सायकली व इतर जुगार गुन्हयाचा माल असा एकूण 5,02,783/- रुपये किंमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रीया करून जप्त करण्यात आला आहे. सदर इसमांचे विरुध्द जुनाराजवाडा पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास जुनाराजवाडा पोलीस करीत आहेत.
या कारवाईत कामगिरी पोलीस अधीक्षक, योगेश कूमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक धीरजकुमार, व उप विभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, जुनाराजवाडा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे, पोलीस उप निरीक्षक संतोष गळवे यांच्यासह आदी पोलिसांनी सहभाग घेतला होता.