जिल्ह्यातील 3 हजार 639 शाळांमध्ये मोठ्या उत्साहात योग दिन संपन्न

जिल्ह्यातील 3 हजार 639 शाळांमध्ये मोठ्या उत्साहात योग दिन संपन्न

कोल्हापूर (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील व शहरातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, खासगी अनुदानित, विना अनुदानित इंग्रजी माध्यमांसह सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये एकाच वेळेत एकूण 3 हजार 639 शाळांमध्ये मोठ्या उत्साहात योग दिन साजरा करण्यात आला. यामध्ये 6 लाख 2 हजार 138 विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी योग दिनात सहभाग नोंदविला होता.

जागतिक योग दिन प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासनामार्फत 45 मिनिटांचा प्रात्यक्षिक व्हिडिओ करण्यात आला. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून योग दिन हा योगयुक्त शनिवार म्हणून शाळा मध्ये शॉर्ट फिल्म व्याख्यान व शाळा परिसरात प्रचार व प्रसार फेरी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये शाळेतील विद्यार्थी, पालक, शिक्षक, माजी विद्यार्थी ,शाळा परिसरातील ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते व तरुण मंडळी सहभागी झाले होते. 

जागतिक योग दिन प्रभावीपणे राबविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रेरणेने व जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या मार्गदशनानुसार तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मीना शेंडकर, व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुवर्णा सावंत यांच्या सूचनानुसार योग दिन साजरा करण्यात आला. 

यामध्ये सहभागी शाळा, सहभागी विद्यार्थी, सहभागी शिक्षण, सहभागी पालक, ग्रामस्थ यांची एकूण आकडेवारी पुढीलप्रमाणे - 

शासकीय शाळा 3, विद्यार्थी 231, शिक्षक 21, पालक व ग्रामस्थ 25 असे एकूण 277 जणांनी सहभाग नोंदविला.  

जिल्हा परिषद शाळा 1 हजार 959, विद्यार्थी 1 लाख 35 हजार 458, शिक्षक 7 हजार 410 पालक व ग्रामस्थ 18 हजार 795 असे एकूण 1 लाख 61 हजार 663 जणांनी सहभाग नोंदविला.  

महानगरपालिका शाळा 57, विद्यार्थी 10 हजार 119, शिक्षक 375, पालक व ग्रामस्थ 590 असे एकूण 11 हजार 84 जणांनी सहभाग नोंदविला.  

नगरपालिका शाळा 55, विद्यार्थी 7 हजार 976, शिक्षक 386, पालक व ग्रामस्थ 831 असे एकूण 9 हजार 193 जणानी सहभाग नोंदविला.  

खासजी अनुदानित शाळा 875, विद्यार्थी 2 लाख 49 हजार 817, शिक्षक 8 हजार 937 पालक व ग्रामस्थ 16 हजार 265 असे एकूण 2 लाख 75 हजार 19 जणांनी सहभाग नोंदविला.  

अंशत: अनुदानित शाळा 79, विद्यार्थी 15 हजार 613, शिक्षक 504 पालक व ग्रामस्थ 972 असे एकूण 17 हजार 89 जणांनी सहभाग नोंदविला.  

विना अनुदानित शाळा 62, विद्यार्थी 11 हजार 222, शिक्षक 576 पालक व ग्रामस्थ 616 असे एकूण 12 हजार 414 जणांनी सहभाग नोंदविला.  

स्वंय अर्थसहायित शाळा 491, विद्यार्थी 98 हजार 490, शिक्षक 4 हजार 671, पालक व ग्रामस्थ 7 हजार 491 असे एकूण 1 लाख 10 हजार 652 जणांनी सहभाग नोंदविला.  

समाज कल्याण शाळा 11, विद्यार्थी 547, शिक्षक 63, पालक व ग्रामस्थ 36 असे एकूण 646 जणांनी सहभाग नोंदविला.  

व्हीजेएनटी शाळा 23, विद्यार्थी 2 हजार 525, शिक्षक 138, पालक व ग्रामस्थ 150 असे एकूण 2 हजार 813 जणांनी सहभाग नोंदविला.  

अपंग कल्याण शाळा 22, विद्यार्थी 873, शिक्षक 106, पालक व ग्रामस्थ 193 असे एकूण 1 हजार 172 जणांनी सहभाग नोंदविला.  

मदरसा शाळा 2, विद्यार्थी 98, शिक्षक 3, पालक व ग्रामस्थ 15 असे एकूण 116 जणांनी सहभाग नोंदविला.  

जिल्ह्यातील शाळा 3 हजार 639, विद्यार्थी 5 लाख 32 हजार 969, शिक्षक 23 हजार 190, पालक व ग्रामस्थ 45 हजार 979 असे एकूण 6 लाख 2 हजार 138 विद्यार्थी, शिक्षक पालक व ग्रामस्थांनी योग दिनात सहभाग नोंदविला होता.