HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

आमदार हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त कागलमध्ये विविध कार्यक्रम संपन्न

आमदार हसन  मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त कागलमध्ये विविध कार्यक्रम संपन्न

कागल प्रतिनिधी :- सुभाष भोसले 

महाराष्ट्र राज्याचे माजी ग्रामविकास व कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त कागल शहरात विविध कार्यक्रम संपन्न झाले.

कागल शहरातील श्री प्रभू राम मंदिरात महाआरती करण्यात आली. व कागल शहरातील गहिनीनाथ गैबीपिर येथे गलेफ अर्पण करण्यात आला.

भारतीय संविधान या ग्रंथाचे वाटप गोकुळचे संचालक नाविद मुश्रीफ, केडीसी संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, शिक्षक सेल अध्यक्ष शंकर संकपाळ , कोजिमाशि संचालक राजेंद्र पाटील, अमर रजपूत, सुनिल माळी, नितीन माळी, संजय कदम, काका पाटील, नंदकुमार कांबळे,शानाजी माने, दिपक पाडवी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलचे सर्व पदाधिकारी यांच्यावतीने करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने श्री शाहू हॉल येथे रक्तदान शिबिरकरणेत आले .

प्रभाग क्रमांक 8 मधील सर्व नागरिकांना साखर व कापडी पिशवी वाटप माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर यांच्या वतीने करण्यात आले.

कागल येथील वाय डी माने बालगृह येथे सरसेनापती संताजी घोरपडे फॅक्टरी कर्मचाऱ्यांच्या वतीने मुलांना स्नेहभोजन वाटप करण्यात आले.

श्री बिरदेव मंदिर कागल येथे सीसीटीव्ही कॅमेरा व एलईडी बल्ब बसवण्यात आला. यावेळी विनायक सनगर यांना उदरनिर्वाहासाठी 25 हजार रुपये आर्थिक मदत करण्यात आली.

श्रीनाथ समूह यांच्या वतीने प्रभागात केक वाटप करण्यात आले. 

श्री गणपतराव गाताडे मूकबधिर शाळेत श्री अस्लम मुजावर, श्री नवाज मुश्रीफ, श्री संजय चितारी यांच्यावतीने स्नेहभोजन वाटप करण्यात आले. व डॅश ग्रुप यांच्याकडून केक वाटप करण्यात आले.हणबर गल्ली व पिष्टे गल्ली येथे केक वाटप करण्यात आला.

कागलचे ग्रामदैवत श्री लक्ष्मी देवालय येथे महिलांच्यासाठी स्वच्छतागृह बांधकाम शुभारंभ श्री. सुनील माळी, श्री. शशिकांत भालबर, श्री.नवीन शिबे यांच्यावतीने करण्यात आला.का

गल शहरातील सणगर सोसायटी येथे वृक्षारोपण करण्यात आले.

कागल शहरातील खर्डेकर चौक येथे गोकुळचे संचालक . श्री.युवराज पाटील (बापु), कृष्णात पाटील यांच्या वतीने सर्व नागरिकांना मोफत उसाचा रस वाटप करण्यात आला.

यावेळी कागल शहरातील प्रमुख पदाधिकारी आजी-माजी नगरसेवक कार्यकर्ते व महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.