जनार्दन गुरव यांची बाजीराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड

जनार्दन गुरव यांची बाजीराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड

पत्रकार- सुभाष भोसले

बाजीराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मुंबई शाखा मलकापूर ४ थ्या वर्धापण दिनानिमित्त रविवार रोजीआयोजित कार्यक्रमात संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती रंजना पाटील व व्यवस्थापकीय संचालक श्री संपतराव पाटील व संचालिका श्वेता पाटील या मान्यवरांच्या उपस्थितीत मलकापूर येथे श्री गणेश मंदिरामध्ये कार्यक्रम संपन्न झाला . यावेळी दिलीपराव पाटील यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत केले तर अध्यक्षा श्रीमती रंजना पाटील . यांच्या शुभहस्ते शाखा मलकापूर येथे नूतन शाखा चेअरमन व संचालक मंडळ नियुक्ती च्या फलकाचे अनावरण करण्यात आले यावेळी मलकापूर शाखा 

चेअरमन म्हणून श्री एन.बी पाटील यांची नियुक्ती व इतर आठ संचालक असे नऊ संचालक मंडळाचे कार्यकरणी जाहीर करण्यात आली. व त्यानंतर शाखा बांबवडे या शाखेच्या चेअरमन व संचालक मंडळ फलकाचे अनावरण करण्यात आले यामध्ये श्री जनार्दन गुरव शाखा चेअरमन व इतर आठ संचालक असे नऊ संचालक मंडळाची नियुक्ती करण्यात आली .यावेळी संस्थेच्या अध्यक्षा व उपस्थित मुंबई संचालक मंडळाच्या वतीने शाखा अध्यक्ष श्री एन बी पाटील शाखा मलकापूर व बांबवडे शाखा अध्यक्ष श्री जनार्दन गुरव यांचा व इतर नऊ संचालकांचा येथे गौरव चिन्ह शाल मानाचा फेटा व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या विकासाची व आर्थिक लेखाजोखा संस्थेची वाटचाल याविषयी मार्गदर्शन व्यवस्थापकीय संचालक श्री.संपतराव पाटील यांनी मांडला तर संस्थेच्या अध्यक्ष संचालक मंडळ व त्यांनी संस्थेच्या साठी दिलेले योगदाना बद्दल त्यांचे अभिनंदन केले. व संस्थेच्या हितासाठी नेहमीच सर्वांचे सहकार्य असेच राहू द्या व शाखेचा विस्तार आणखी उंच उंच होत राहू द्या अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी चौथ्या वर्धापन दिनानिमित्त को.जी. मा शी संचालक श्री प्रकाश कोकाटे श्री पाटील एन.बी. संचालिका. सौ.श्वेता पाटील व श्री जनार्दन गुरव . श्री दिलीप पाटील सुरेश नारकर, शाखा संचालक या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केली व संस्थेच्या प्रगतीमध्ये आपले योगदान देण्याचे आश्वासन देऊन संस्था प्रगती व विविध प्रकारच्या ठेवी नवनवीन संस्थांच्या हिताच्या योजना अधिकाधिक राबवण्याचे निर्णय बोलून दाखवले. यावेळी मलकापूर शाखा व्यवस्थापक श्री भाऊसाहेब पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती रंजना पाटील.. संचालक श्री संपतराव पाटील संस्थेच्या संचालिका सौ.श्वेता पाटील,श्री.सर्जेराव नलगे . शाखा व्यवस्थापक श्री शिवाजी पाटील,शाखा व्यवस्थापक श्री सुधीर कुंभार श्री.राजेश पाटील श्री.सचिन तांदळे . दीपक लाड व विविध संस्थेतील मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.