अध्यापक के. व्ही. पाटील यांचे शैक्षणिक विकासात योगदान मोठे. :-आमदार हसन मुश्रीफ यांचा गौरवोद्गार

अध्यापक के. व्ही. पाटील यांचे शैक्षणिक विकासात योगदान मोठे.  :-आमदार हसन मुश्रीफ यांचा गौरवोद्गार

सोनगे ता. कागल येथील अध्यापक के. व्ही. पाटील यांचे शैक्षणिक विकासात योगदान मोठे आहे, असे गौरवोद्गार आमदार हसन मुश्रीफ यांनी काढले. ३३ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक गुणवंत विद्यार्थी घडविले आहेत, असेही ते म्हणाले.

    सोनगे ता. कागल येथे अध्यापक के. व्ही. पाटील यांच्या सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभात आमदार श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संजयबाबा घाटगे होते.

   भाषणात आमदार श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, अध्यापक के. व्ही. पाटील यांनी केलेल्या भरीव व उल्लेखनीय कार्यामुळेच त्यांचा लोकसंग्रहही मोठा आहे. यापुढील आयुष्य त्यांनी विधायक सामाजिक कार्यासाठी वाहून घ्यावे.             

  माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, पदवीधर अध्यापक म्हणून के. व्ही. पाटील यांनी केलेले कार्य निश्चितच उल्लेखनीय आहे. त्यांनी केलेल्या भरीव कार्यामुळेच शिक्षण क्षेत्रासह शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्येही त्यांना आदराचे स्थान आहे.

 सत्काराला उत्तर देताना अध्यापक के. व्ही. पाटील म्हणाले, ३३ वर्षांच्या शिक्षकी कारकीर्दीमध्ये अत्यंत प्रामाणिकपणाने आणि सचोटीने काम केले. आपल्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले गुणवंत आणि कर्तबगार विद्यार्थी हीच आपल्या आयुष्याची खरी कमाई आहे, असेही ते म्हणाले.

व्यासपीठावर माजी आमदार संजयबाबा घाटगे, सोनगेच्या सरपंच सौ. धनश्री पाटील, उपसरपंच श्रीमती गीताताई गुरव, सुनील घोरपडे ईश्वरा देवडकर प्रल्हाद देवडकर, संजय कळंत्रे बाळासाहेब घोरपडे, दिनकरराव ढोले, धनाजी पाटील, रवींद्र पाटील बाळासाहेब शिंत्रे बाळासाहेब पाटील, पांडुरंग कुंभार, श्रीपती देवडकर, कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकासराव पाटील, प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक बाळासो निंबाळकर, जि. प. कर्मचारी सोसायटीचे संचालक सुनील पाटील, चौंडाळचे सरपंच मारुती पाटील, राजेंद्र रेपे आनंदा साळोखे, एस. के. पाटील, संजय कदम, बळवंत तिप्पे, माजी सरपंच नारायण ढोले, तुकाराम ढोले, विलास कळंत्रे, पांडुरंग कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी लक्ष्मी पुजारी, अक्षय लोंढे यांनी मनोगते व्यक्त केली.

स्वागत सुकुमार पाटील यांनी केले. प्रास्ताविक कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस वक्तासेलचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केले. आभार कागल तालुका राष्ट्रवादी शिक्षक सेलचे अध्यक्ष शंकर संकपाळ यांनी मानले. सूत्रसंचालन विवेक गवळी यांनी केले.

सोनगे येथील प्राथमिक शिक्षक के. व्ही. पाटील यांचा सेवानिवृत्तीपर सपत्नीक सत्कार आमदार हसन मुश्रीफ व माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या हस्ते झाला.