HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

शरद इन्स्टिट्युटमध्ये सीमा भागातील विद्यार्थ्यांना संधी : शिवराज नाईकवडे

शरद इन्स्टिट्युटमध्ये सीमा भागातील विद्यार्थ्यांना संधी : शिवराज नाईकवडे

यड्राव - ‘दहावी - बारावी नंतर पुढील शिक्षणाचे क्षेत्र निवडताना विद्यार्थी व पालकांची संभ्रमावस्था झालेली असते. जगभरातील शिक्षण क्षेत्रातील संधी यांची माहिती नसल्याने निर्णय होत नाहीत, ध्येय ठरविले जात नाहीत. मात्र शरद इन्स्टिट्युटने महाराष्ट्र - कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन परिसंवाद आयोजित करुन चांगले काम केले आहे. तसेच शरद इन्स्टिट्युटमधील विविध कोर्सेस, शिष्यवृत्ती याची माहिती देवून सीमा भागातील ८६५ गावातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.’ असे प्रतिपादन निपाणी पोलिस ठाण्याचे अधिकारी शिवराज नाईकवडे यांनी केले.

ते शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी तर्फे निपाणी येथे विद्यार्थ्यांकरीता करिअर मार्गदर्शन परिसंवादात बोलत होते. यावेळी जेष्ठ करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर, संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे प्रमुख उपस्थित होते.

नाईकवडे पुढे म्हणाले, ‘सोशल मिडियाचा उपयोग कसा करायचा ते प्रत्येकाने ठरविले पाहिजे. मोबाईल चांगल्या कामासाठीच वापर करावा. वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळा. ज्या क्षेत्रात जाल त्यामध्ये झोकून देवून काम करा.’

वेलणकर म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी असे क्षेत्र निवडायला हवे ज्यामधून रोजगार, स्वयंरोजगार, व्यवसाय निर्माण होईल. त्यासाठी कोणते कौशल्य आत्मसात करायला हवे याची माहिती करुन घ्यायला हवी. इंटर्नशीप, प्रोजेक्ट, प्रॅक्टीकलसह विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक उपक्रम राबवून स्वत:चा “शरद पॅटर्न” निर्माण करणारे म्हणजे शरद इन्स्टिट्युट आहे. यावेळी त्यांनी जगभरात कोणत्या संधी उपलब्ध आहेत, त्यासाठीच्या पात्रता परिक्षा, महाविद्यालये यांची माहिती दिली.’

बागणे म्हणाले, ‘विकसित देशांची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढली आहे. कारण तेथील शिक्षण पध्दती महत्वाची आहे. प्रत्येकाने बारावी नंतर काय करायचे ठरवायला हवे. कौशल्यपूर्ण शिक्षण मिळेल अशा ठिकाणी प्रवेश घ्यावे. शरद इन्स्टिट्युटने गुणवत्तेंचे मापदंड ओलांडले आहेत.’ 

प्रा. ए. बी. जाधव यांनी सर्व विभागासाठी लागणारी कागदपत्रे, शिष्यवृत्ती व प्रवेश प्रक्रिया याची माहिती दिली. 

यावेळी शरद इन्स्टिट्युटचे डिन, विभागप्रमुख, प्राध्यापक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.