HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

इंडोनेशियन साखर तज्ञांची शाहू साखर कारखान्यास भेट

इंडोनेशियन साखर तज्ञांची शाहू साखर कारखान्यास भेट

कागल : इंडोनेशिया देशातील साखर उद्योगातील तज्ञांच्या शिष्टमंडळाने येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास भेट दिली. अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने आलेल्या या शिष्टमंडळाने भारतातील साखर उद्योगात वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेतली.यावेळी भारत व इंडोनेशिया या दोन देशातील साखर उद्योगात वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाची तुलनात्मक चर्चासुद्धा झाली. इंडोनेशियातील आघाडीच्या साखर तज्ज्ञांचा समावेश असलेल्या या शिष्टमंडळाने 'शाहू'च्या आधुनिक तंत्रज्ञान वापराचे कौतुक केले.

शाहू कारखान्यातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत माहिती देताना कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण म्हणाले, साखर कारखानदारीतील आधुनिक तंत्रज्ञान शाहू कारखान्यात सर्वप्रथम अवलंबण्यात कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी नेहमीच प्राधान्य दिले. त्यांच्या पश्चात शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनीसुद्धा आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यास प्राधान्य दिले आहे. शाहू कारखान्याने साखर कारखानदारीतील नवनवीन प्रयोग सर्वप्रथम यशस्वी राबवले आहेत. शाहू ने स्वतःशीच स्पर्धा करत नवीन बदल अंगीकारले आहेत. त्यांनी शाहू ग्रुपमधील विविध संस्था व त्यांचे समाजाभिमुख कामकाजाबाबत सविस्तर माहिती स्लाईड शोद्वारे या शिष्टमंडळास दिली.

शिष्टमंडळाचे प्रमुख म्हणाले,केबाॕन एगंग शुगर इंडस्ट्रीचे तांत्रिक विभाग प्रमुख मुजीअँटो म्हणाले,इंडोनेशिया देशांतर्गत साखर मागणी इतकी साखर उत्पादित करू शकत नाही.त्यामुळे साखर आयात करावी लागते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस उत्पादकता व साखर उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहनाचे सरकारचे धोरण आहे. त्यादृष्टीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या निवडक कारखान्यांना भेटी देऊन माहिती घेण्याच्यादृष्टीने अभ्यास दौरा करीत आहोत. साखर कारखानदारीतील शाहू'च्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापराच्या अनुभवाचा आम्हाला निश्चितपणे होईल.असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कारखान्याच्या सहवीज निर्मिती,इथेनॉल, सल्फरलेस साखर,बायोगॕस निर्मिती प्रकल्पांचीही त्यांनी माहिती घेतली.यावेळी पीटी गोल्डनचे विक्री अधिकारी इंद्र गुणवान,प्रक्रिया विभाग प्रमुख युद्धो विद्धी, पुण्याच्या जे.पी.मुखर्जी असोसिएट्सचे कार्यकारी संचालक शिरिष करंदीकर,इंडोनेशियन व शाहू साखर कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.