HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

डी. वाय पाटील कृषी विद्यापीठाच्या 13 विद्यार्थ्यांची डी - मार्टमध्ये निवड

डी. वाय पाटील कृषी विद्यापीठाच्या 13 विद्यार्थ्यांची डी - मार्टमध्ये निवड

कोल्हापूर प्रतिनिधी : डी. वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ, तळसंदे येथे डी मार्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये १३ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

 24 व 25 जानेवारी रोजी हा कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह झाला. डी मार्ट हा भारतातील एक अग्रगण्य किराणा ब्रँड असून देशभरात विविध स्टोअर्स आहेत. डी मार्ट रेस्ट ऑफ महाराष्ट्र उपाध्यक्ष उत्तम पाटील, सर्कल हेड महेश पवार, अनाल पाटणकर, हेड टॅलेंट एक्विझिशन राजेश राजवर्धन, रीजनल एचआर हेड बाला शेलार, सर्कल एचआर मॅनेजर सहदेव पाटील आणि सीनियर कंप्लायंसेस ऑफिसर गिरीश अर्दळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पूर्ण झाली.

   

या कॅम्पस ड्राईव्हसाठी आरआयटी (राजारामनगर) सायबर कॉलेज, अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, भारती विद्यापीठ, संजय घोडावत विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड स्टडीज, व्यंकटेश्वर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, डी वाय पाटील अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालय, डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पस, आणि डी वाय पाटील आणि कृषी आणि तंत्र विद्यापीठचे 250 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये एकूण 59 विद्यार्थ्यांची निवड झाली. यामध्ये डी. वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठच्या स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट आणि द स्कूल ऑफ अॅग्री बिझनेस मॅनेजमेंटच्यास 13 विद्यार्थी सहभाग आहे.  

 निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये दिग्विजय पडवळ, विवेक चव्हाण, समीरा मुल्ला, ऋतुजा सावंत, दक्षता धारवत, प्रणाली माली, गौरव सूर्यवंशी, अक्षय शेळके, स्वागत थोरावत, सुजीत मडणे, काजल भोसले, प्रियांका राऊत, वैष्णवी गावणे यांचा समावेश आहे.

डी. वाय. पाटील टेक्निकल कँपसच्या इंद्रायणी कुलकर्णी, निकिता सुर्यवंशी, साक्षी आलासे या तिघांचीही यावेळी निवड झाली. 

 या उपक्रमासाठी टीपीओ प्रदीप पाटील आणि स्वराज पाटील यांनी प्रयत्न केले आहेत. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतूराज पाटील, कुलगुरू प्रा. डॉ. के. प्रथापन, कुलसचिव प्रा. डॉ.जयेंद्र ए. खोत, वित्त अधिकारी सुजीत सरनाईक, डीन प्रा. (डॉ.) मुरली भूपती आणि असोसिएट डीन डॉ. शुभांगी जगतप यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.