के.एम.टी मधील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकरिता महानगरपालिका प्रशासन सकारात्मक होणार असेल तर आंदोलनाबाबत पुनर्विचार करू! ..प्रा. शहाजी कांबळे

के.एम.टी मधील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकरिता महानगरपालिका प्रशासन सकारात्मक होणार असेल तर आंदोलनाबाबत पुनर्विचार करू! ..प्रा. शहाजी कांबळे

कोल्हापूर प्रतिनिधी मुबारक अत्तार 

  रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाकडे कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. यामध्ये सातवा वेतन आयोग लागू करणे, सातव्या वेतन आयोगाचा फरक टप्प्याटप्प्याने देणे, ठोक वेतनावर रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना कायम करणे, केएमटी ची वेळापत्रक नियमित करून सेवाजेष्ठांच्या वर अन्याय होणार नाही याची काळजी घेणे आणि राखीव जागा अनुशेष तपासणी पूर्ण झालेली आहे त्यामुळे ऑर्डर देणे. यासारख्या महत्त्वाच्या-निकडीच्या मागण्या घेऊन सातत्याने संघर्ष चालू आहे. यासंदर्भात महानगरपालीका परिवहन विभागाने, आयुक्तांच्या सूचनेनुसार 10 एप्रिल पर्यंत पाठपुरावा करून मागण्या मान्य न केल्यास रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा एम्प्लॉईज फेडरेशनचे मार्गदर्शक आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे महाराष्ट्र राज्याचे संघटन सचिव प्रा. शहाजी कांबळे सर यांनी दिला. आज महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या अतिरिक्त व्यवस्थापक टीना गवळी मॅडम यांच्या कार्यालयात फेडरेशनच्या शंभर एक कार्यकर्त्यांनी घेराव घालून मागण्या मान्य करण्यासाठी ठिय्या धरला. 

यावेळी परिवहन अतिरिक्त व्यवस्थापक टीना गवळी मॅडम यांच्याशी झालेल्या चर्चे मध्ये उपरोक्त मागण्या केल्या. या मागण्या मान्य केल्या नाहीत तर प्रसंगी के.एम.टी. बंद सुद्धा केली जाईल असा इशारा देखील यावेळी दिला. 

परंतु ... जर महानगरपालिका सकारात्मक दृष्ट्या या मागण्यांकडे बघून कामकाज चालू करणार असेल तर मात्र आंदोलन न करता संवादातून हे प्रश्न सोडवले जातील असेही यावेळी आंदोलकांच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी गवळी मॅडम म्हणाल्या की एक एप्रिल पासून सातव्या वेतन आयोगाच्या मंजुरी करता ची फाईल आयुक्त महोदया यांच्याकडे पाठविली जाईल. वेळापत्रक नियमित केलं जाईल रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही यासाठीचे अभिवचन हि त्यांनी दिले, त्याचबरोबर वेतन आयोगा करिता फरकाची रक्कम काही प्रमाणात के.एम.टी. कडून दिली जाईल असेही अतिरिक्त व्यवस्थापक गवळी मॅडम यांनी. सांगितले  

       यावेळी यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा रूपाताई वायदंडे, जिल्हा उपाध्यक्ष जानबा कांबळे, एम्प्लॉईज फेडरेशनचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष एम.डी. कांबळे, फेडरेशनचे उत्तम कांबळे, दत्ता बामनेकर, सागर वैराट, श्री पिजारी, तानाजी मेंगाने, प्रकाश चौगुले, सुभाष कामत, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा पदाधिकारी बाबासो धनगर, कुंडलिक (बटू) भामटेकर, सागर कांबळे, केरबा कांबळे, अक्शय कांबळे या प्रमुखांसह एम्प्लॉईज फेडरेशनचे सदस्य मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.