HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

प्लास्टिक सर्जरीमुळे रुग्णांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल- डॉ. संजय डी. पाटील

प्लास्टिक सर्जरीमुळे रुग्णांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल- डॉ. संजय डी. पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी : डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्यावतीने गेली वीस वर्ष रुग्णांना माफक दरात आरोग्य सुविधा उपलब्ध केली जात आहे. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिरामुळे रुग्णांमध्ये नव्याने आत्मविश्वास निर्माण होऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटेल असा विश्वास डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ संजय डी पाटील यांनी व्यक्त केला. 

डी वाय पाटील हॉस्पिटल कदमवाडी येथे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे उद्घाटन डॉ. संजय डी. पाटील व अन्य मान्यवरांच्या हस्ते झाले. जन्मतः फाटलेले ओठ किंवा टाळू, जन्मतः लघवीचा बदललेला मार्ग, चेहऱ्याचे व्यंग, भाजल्यामुळे आलेली विद्रुपता, स्नायूंचा आखडलेपणा, बसलेले नाक व विद्रुप बोटे यावर दिल्ली, लुधियाना, बडोदा, राजकोट, पुणे येथील तज्ञ डॉक्टरांमार्फत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. 

यावेळी बोलताना डॉ. पाटील म्हणाले, रोटरी क्लबच्या माध्यमातून नेहमीच अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. डी. वाय पाटील हॉस्पिटलला रोटरी क्लबचे नेहमीच सहकार्य लाभले आहे. भविष्यात देखील रोटरीच्या उपक्रमाना आमचे पाठबळ मिळेल. या तीन दिवसीय शिबिरामुळे शारीरिक व्यंग असणाऱ्या किंवा शरीरावर व्रण असलेल्या अनेक रुग्णांना फायदा होणार आहे. या प्लास्टिक सर्जरीमुळे आत्मविश्वास गमावलेल्या रुग्णांमध्ये तो नव्याने निर्माण होईल याची खात्री आहे. या शिबिरात 150 हून अधिक पेशंटनी नोंदणी केली आहे. उपचारानंतर त्यांची योग्य ती काळजी हॉस्पिटल घेईल. हे सर्व रुग्ण येथून उत्तम उपचार घेऊन नक्कीच समाधानाने परत जातील याची खात्री देतो. 

ते पुढे म्हणाले, डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातूनही आम्ही नेहमीच समाजातील गरजू आणि गरीब रुग्णांसाठी विविध उपक्रम राबवत आलो आहोत. हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी पूर्णपणे मोफत उपचार केले जातात. नॉर्मल असू दे किंवा सिजेरियन दोन्ही प्रकारच्या डिलिव्हरीही मोफत केल्या जात आहेत. हॉस्पिटलमध्ये आम्ही दररोज 25 -30 सर्जरी मोफत करतो. हे काम यापुढेही असेच चालू राहील. 

ख्यातनाम प्लास्टिक सर्जन डॉ. एस पी बजाज म्हणाले, शारीरिक व्यंग, व्रण, फाटलेले ओठ अशा अनेक समस्या असलेले हजारो लोक प्लास्टिक सर्जरी उपचारांपासून आजही वंचित आहेत. अशा लोकांसाठी रोटरी क्लबने पुढाकार घेतला आहे. गेली २० वर्षे हा कौतुकास्पद उपक्रम राबवला जात आहे. आता डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून अधिकाधिक रुग्णांना याचा फायदा होईल असा विश्वास आहे. 

रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर राहुल कुलकर्णी, असिस्टंट गव्हर्नर यतीराज भंडारी, रोटरी क्लब कोल्हापूरचे प्रेसिडेंट अरुण गोयंका, रोटरी क्लब इचलकरंजीचे इव्हेंट कॉर्डीनेटर रिशी मोहंका, ख्यातनाम प्लास्टिक सर्जन डॉ. एस पी बजाज, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. 

यावेळी रोटरी क्लब कोल्हापूरचे सेक्रेटरी साहिल गांधी, इव्हेंट चेअरमन डॉ. अभिजीत हावळ, रोटरी क्लब इचलकरंजीचे प्रेसिडेंट संतोष पाटील, सेक्रेटरी चंद्रकांत मगदूम, डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. राकेश कुमार शर्मा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, डॉ. रविद्र तहा, डॉ. राजेन्द्र गांधी, डॉ. हिरेन भट, डॉ. पियुष दोषी, डॉ. अरुण देशमुख, डॉ. शीतल मिरचूटे, डॉ. संदीप कदम, संजय जाधव, अजित पाटील आदी उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.