HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

घोडावत विद्यापीठाची सिंगापूर-मलेशिया अभ्यास सहल यशस्वी

घोडावत विद्यापीठाची सिंगापूर-मलेशिया अभ्यास सहल यशस्वी

हातकणंगले (प्रतिनिधी) :संजय घोडावत विद्यापीठातील 26 विद्यार्थ्यांनी व्यवसाय संशोधनाच्या उद्देशाने नुकतीच सिंगापूर आणि मलेशिया येथील संशोधन केंद्रांना भेट देऊन अभ्यास सहल यशस्वी केली. विद्यापीठातील ग्लोबल सेलच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

    यामध्ये मलेशिया येथील UCSI युनिव्हर्सिटी ला भेट देण्यात आली. व्यवसाय संशोधनातील अद्यावत तंत्रज्ञाची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली तसेच तेथे डेटा ऍनालीटीकस या विषयावर सर्टिफिकेट कोर्स घेण्यात आला. त्याच सोबत मलसिया स्टॉक एक्सचेंज Bursa मलेशिया येथे भेट देण्यात आली. स्टॉक एक्सचेंज च्या विषयावर शैक्षणिक सत्र घेण्यात आले. तेथील कामकाजाची व फायनान्सियल  प्रॉडक्ट्स आणी सेक्युरिटी बद्दल विद्यार्थ्यांनी माहिती घेतली. सिंगापूर येथे मरिना साऊथ पीअर येथे भेट देण्यात आली. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय समुद्री आयात निर्यात याची सखोल माहिती मिळाली. 

   तसेच या देशातील  प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्यात आल्या. विद्यार्थ्यांना अंतरराष्ट्रीय औद्योगिक आणि शैक्षणिक संधींची  माहिती मिळावी या उद्देशाने या पूर्वीही ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दुबई या ठिकाणी शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन घोडावत विद्यापीठाकडून करण्यात आले होते.

       या  उपक्रमात विद्यार्थ्यांसोबत  प्रा.पूजा खोपकर होत्या. यासाठी विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वास्त  विनायक भोसले,कुलगुरू  प्रो.उद्धव उद्धव भोसले, रजिस्ट्रार डॉ.विवेक कायंदे, मॅनजमेंट विभागाच्या डीन डॉ.योगेश्वेरी गिरी आणि ग्लोबल सेल च्या अमृता हांडूर यांचे सहकार्य लाभले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.