उचगावच्या दिव्यांग खेळाडू ला हवाय मदतीचा हात

कंबोडिया येथील स्पर्धेत निवड: आर्थिक मदतीचे आवाहन

उचगावच्या दिव्यांग खेळाडू ला हवाय मदतीचा हात

 उचगाव तालुका करवीर येथील उत्तम सदाशिव चौगुले हे दिव्यांग खेळाडू आहेत.  दिल्ली येथे त्यांनी  दिव्यांगाच्या राष्ट्रीय स्पर्धेत (सिल्वर मेडल) मिळवत  द्वितीय क्रमांक  मिळवला आहे. या स्पर्धेतील यशानंतर त्यांची   कंबोडिया देशांमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कंबोडिया या  देशां त होणाऱ्या  स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तसेच तेथील स्पर्धा गाजविण्याची त्याची तीव्र इच्छा आहे.पण स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. आर्थिक परिस्थिती अभावी त्यांची कुचबना होत आहे. 

उचगाव व कोल्हापूर जिल्ह्यातील क्रीडा प्रेमी, दानशूर व्यक्ती, संस्था, उद्योजक, विविध तरुण मंडळे यांना नम्र विनंती करण्यात येत आहे की, मला  आर्थिक स्वरूपात मदतीचा हात देऊन  माझ्यासारख्या  दिव्यांग खेळाडूला उचगाव वासियांनी मोलाचे सहकार्य करावे. निश्चितच मी उचगावचे नाव जगाच्या नकाशावर नेण्याचा प्रयत्न करीन. तरी माझी कळकळीची विनंती आहे की मला आपण मदत करून प्रोत्साहन द्यावे.

माझा मोबाईल नंबर 70 83 65 39 59 आहे. या मोबाईल नंबर वर आपल्या स्व -इच्छेने (  GOOGLE PAY किंवा PHONE PAY ) जेवढी आर्थिक मदत करता येईल तेवढी करावी  ही नम्र विनंती                             आपला उत्तम चौगुले

दिव्यांग खेळाडू

उचगाव (ता. करवीर) जि. कोल्हापूर