HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

कोल्हापूर चित्पावन संघातर्फे गुढी पाडव्याच्या शुभदिनी हिंदू नववर्ष दिनदर्शिकेचे प्रकाशन

कोल्हापूर चित्पावन संघातर्फे गुढी पाडव्याच्या शुभदिनी हिंदू नववर्ष दिनदर्शिकेचे प्रकाशन

कोल्हापूर : भिंतीवर अडकवण्याची बहुतेक सर्व कॅलेंडर ही इंग्रजी महिन्याप्रमाणे असतात त्यामुळे मराठी महिन्यांची ओळख तसेच तिथी,नक्षत्र या गोष्टी हळूहळू विस्मरणात जात आहेत. हे लक्षात घेऊन चैत्र वैशाख याप्रमाणे प्रामुख्याने मराठी महिन्यांची दिनदर्शिका असावी अशी संकल्पना कला कल्पना या जाहिरात संस्थेचे संजीव चिपळूणकर मांडली व ती सलग तिसऱ्या वर्षी परिपुर्ण केली.

या दिनदर्शिकेत सर्व मुहूर्त, प्रत्येक महिन्याचे राशिभविष्य, विविध दैवतांची ठिकाणे , तेथे जाण्याबाबतची माहिती, शुभ दिवस, लग्न, वास्तू शांती व विविध समारंभाचे मुहूर्त अशी परिपूर्ण माहिती दिली आहे. अशा दिनदर्शिकेची आवश्यकता होती. त्यामुळे किमान पुढील पिढीला मराठी महिने व परंपरांची माहिती होईल. व अशा स्वरूपाची दिनदर्शिका असावी असे अनेक वर्षापूर्वी आमचे स्वप्न होते, ते आता प्रत्यक्षात आले आहे. असे मत चित्पावन संघाचे ज्येष्ठ संचालक  नंदकुमार मराठे यांनी या दिनदर्शिकेच्या प्रकाशन प्रसंगी मांडले. सर्वांनीच या कामाचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष प्रसाद भिडे यांनी केले, व अशा उपक्रमाची आवश्यकता असल्याचे नमूद केले , संजीव चिपळूणकर यांनी अनेकांच्या मदतीतून ही दिनदर्शिका साकारली असून मराठी महिन्यासोबत आर्थिक वर्षाची दिनदर्शिका म्हणूनही ती वापरता येईल असे सांगितले. आपल्या संस्कृतीचे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचावे ही त्यामागची भूमिका असल्याचे सांगून सर्वांनी त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा असे आवाहन केले. शेवटी केदार जोशी यांनी आभार मानले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.