HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

कोल्हापुरात हज यात्रा 2023-24 साठी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक

कोल्हापुरात हज यात्रा 2023-24 साठी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक

कोल्हापूर दिनांक 8 -  केंद्रीय हज कमिटी व महाराष्ट्र राज्य हज कमिटीच्या निर्देशानुसार कोल्हापुरात यंदा हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी 2023_24 हज यात्रेचे ऑनलाईन

अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया कोल्हापुरातील दसरा चौक येथील मुस्लिम बोर्डिंग येथे सुरू आहे.आजपासून दोन दिवस म्हणजे 10 मार्च 2023 पर्यंतच याची मुदत असून यंदा हज यात्रा करण्याची इच्छा असलेल्या यात्रेकरूंनी तात्काळ आपल्या कागदपत्रांसह आपला हज फॉर्म भरावा असे आवाहन हज फौंडेशनचे अध्यक्ष समीर मुजावर, लिंम्रास चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हाजी इक्बाल देसाई, तसेच हज फौंडेशनचे उपाध्यक्ष हाजी बालेचांद म्हालदार,हाजी बाबासाहेब शेख,यासिन उस्ताद,इम्तियाज बागवान, सादत पठाण,हाजी समीर पटवेगार,हाजी अस्लम मोमीन,इम्रान आत्तार, रियाज बागवान,नूर मुजावर, यांनी केले आहे.

10 मार्च अखेर सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ही ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सुविधा सुरू राहणार आहे.यावर्षी हज फाउंडेशन कोल्हापूर लिंम्रास फाउंडेशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हज यात्रेचे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संपूर्ण जिल्हाभर राबविण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर शहर , इचलकरंजी, आजरा, चंदगड गडहिंग्लज,शिरोळ-राजापूर, कागल,शाहूवाडी, पन्हाळा, जयसिंगपूर, पेठवडगाव,इचलकरंजी मलकापूर या ठिकाणी अर्ज दाखल करण्यासाठीची सुविधा करण्यात आली आहे.

यंदा कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या यात्रेकरूंनी पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड तीन पासपोर्ट साईज रंगीत फोटो,वारसाचे नाव व दोन मोबाईल क्रमांक,अशा कागदपत्रांसह संपर्क साधावा असे आवाहन हाजी इकबाल देसाई, पत्रकार समीर मुजावर यांनी केले आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.