ए डी पाटील यांनी आपल्या कार्यातून अनेकाचे गोरगरिब जनतेचे संसार फुलवलेत! गोकुळचे चेअरमन, अरुण कुमार डोंगळे यांचे प्रतिपादन

गुडाळ /वार्ताहर संभाजी कांबळे
गुडाळेश्वर सहकार समूहाचे संस्थापक ए डी पाटील यांचे सहकार,सामाजिक क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे.त्यांनी सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीतून सहकारात काम केल्यामुळे गोरगरिबांचे संसार फुलले,त्यांच्या कार्यातून त्यांची सहकार महर्षी अशी ओळख निर्माण झाल्याचे गौरवोद्गार गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी काढले. ते राधानगरी तालुक्यातील गुडाळ इथं बोलत होते
खेड्यापाड्यातील तरुणांमध्येच जिद्द व चिकाटी असते. त्यामुळेच राधानगरीसारख्या डोंगराळ तालुक्यामधील खेड्यापाड्यातील तरुणांनी शासकीय सेवेत हे संपादन केले. हे यश कौतुकास्पद आहे,
गुडाळ (ता. राधानगरी) येथील गुडाळेश्वर सहकार समूहाच्यावतीने भोगावती खोऱ्यातील स्पर्धा परीक्षांमध्ये, पोलीस भरतीमध्ये यश मिळवलेल्या तरुण-तरुणींच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भोगावतीचे माजी संचालक महादेवराव कोथळकर हे होते.
कार्यक्रमाचे संयोजक भोगावती कारखान्याचे संचालक ए. डी. पाटील यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थिनींना समूहाच्या वतीने नोकरीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी लागणारा प्रवास खर्च देण्याची घोषणा प्रास्ताविक भाषणात केली.
यावेळी गोकुळच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल अरुण डोंगळे यांचा, स्वीकृत संचालकपदी निवड झालेले आर. के. मोरे, अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त ए. डी. पाटील, बाजार समितीचे संचालक शिवाजीराव पाटील, सौ. सोनाली पाटील यांचे सत्कार समूहाच्या वतीने व संभाजीराव कांबळे परिवारा मार्फत ए डी पाटील साहेब यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचेही सत्कार संपन्न झाले.
याप्रसंगी शिवाजीराव पाटील, आशिष पाटील, विक्रमसिंह चव्हाण, डॉ. ए.बी.माळवी, विजय मोहिते यांची भाषणे झाली.
या कार्यक्रमास भोगावतीचे संचालक संजयसिंह पाटील, रवींद्र पाटील, मानसिंगराव पाटील, डी. के. पाटील, राजू पाटील, जयवंत पाडळकर आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन विश्वास आरडे यांनी, स्वागत माजी सरपंच अभिजीत पाटील यांनी तर गुडाळेश्वर विकास संस्थेचे चेअरमन इंद्रजीत पाटील यांनी आभार मानले.
गुडाळ : गुडाळेश्वर सहकार समूहाच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात बोलताना अरुण डोंगळे, शेजारी ए.डी.पाटील, मानसिंगराव पाटील,आशिष पाटील, अभिजीत पाटील, डॉ.ए. बी. माळवी, इंद्रजीत पाटील, डी. के. पाटील आदी उपस्थित होते