राधानगरी धरण स्थळावर छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

राधानगरी धरण स्थळावर छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

राधानगरी (प्रतिनिधी) - राधानगरी धरण स्थळावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शाहू महाराज स्मृती केंद्र स्मारक समितीच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या 149 व्या जयंतीनिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबवून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कोल्हापूर संस्थांचे युवराज यशराजराजे छत्रपती आणि आमदार प्रकाश आबीटकर यांच्या हस्ते पुतळा व कलश पूजन करून अभिवादन करण्यात आले. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्मारक समितीचे अध्यक्ष व गोकुळचे संचालक अभिजीत तायशेटे हे होते .यावेळी छत्रपती शाहू महाराज मूर्ती स्थळ विधीवत पूजन तसेच शालेय विद्यार्थ्यांना साहित्याच वाटप करण्यात आले.

तसेच राधानगरी परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कर्तुत्वान युवक व युवती, माजी सैनिक ,शासकीय अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तहसीलदार अनिता देशमुख पोलीस निरीक्षक स्वाती गायकवाड, गटविकास अधिकारी संदीप भंडारी ,फेजवडीचे सरपंच फारूख नवाळे ,दाजीपूरच्या सरपंच प्रतिभा कोरगावकर, माजी सरपंच कविता शेट्टी माजी सरपंच बशी राऊत वनक्षेत्रपाल सुहास पाटील, मंडल अधिकारी सुंदर जाधव, जलसंपदा विभागाचे अभियंता प्रवीण पारकर, समीर निरुखे यांच्यासह राधानगरी,पडळी ग्रामपंचायत सदस्य,व्यापारी , शेतकरी यांच्यासह तालुक्यातील अनेक शाहूप्रेमी जनता यावेळी उपस्थित होते