जिल्ह्यात पुराचा धोका वाढला
कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी
धरण पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आज राधानगरी धरणाचे एकूण पाच दरवाजे उघडले आहेत. सद्यस्थितीत दरवाजा क्रमांक 3, 4, 5, 6 आणि 7 असे पाच दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पुराचा धोका वाढला आहे.
स्वयंचलित दरवाजातून सध्या 5712 क्यूसेकने नदीपात्रात विसर्ग सुरु आहे, तर पॉवर हाऊसमधून 1400 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. असा एकूण 7112 क्यूसेकने विसर्ग सुरु आहे. त्यामुळे पंचगंगा नदी इशारा पातळीवरून वाहत असल्याने नदी धोका पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. आज सकाळी राजाराम बंधाऱ्यावर पंचगंचेची पाणी पातळी 40 फुट 5 इंच इतकी झाली आहे. सध्या जिल्ह्यातील 81 बंधारे पाण्याखाली आहेत.
राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले
https://youtu.be/b1DGl2qVS9c