एन.सी.सी.मधून तरुणाच्यात देशप्रेम निर्माण होते : ब्रिगेडियर आर. के. पैठणकर

एन.सी.सी.मधून तरुणाच्यात देशप्रेम निर्माण होते : ब्रिगेडियर आर. के. पैठणकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर एनसीसी गटमुख्यालयाचे प्रमुख ब्रिगेडियर आर के पैठणकर यांनी महावीर महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाला सदिच्छा भेट दिली. यावेळी एन.सी.सी. छात्र व अधिकाऱ्यांशी संवाद साधताना असे प्रतिपादन केले की,एन.सी.सी.च्या माध्यमातून विद्यार्थ्याच्यात देश प्रेम निर्माण होते " तरुणांना सैन्यदलात अनेक करिअरच्या संधी उपलब्ध होतात, त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी एन.सी.सी.मध्ये प्रवेश घ्यावा असेही आवाहन यावेळी ब्रिगेडियर आर. के. पैठणकर यांनी केले.

यावेळी त्यांनी महावीर महाविद्यालयांच्या एन.सी.सी. विभागातील कामाचा आढावा घेतला. यावेळी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ.उषा पाटील यांनी महाविद्यालयातील विविध विभागाची माहिती दिली. यावेळी कर्नल संधान मिश्रा, लेफ्टनंट कर्नल अमित कुमार, उपस्थित होते. महाविद्यालयातील एन.सी.सी. छात्रानी ब्रिगेडियर आर. के. पैठणकर यांना गार्ड ऑफ होणार दिला. या भेटीचे आयोजन कॅप्टन उमेश वांगदरे,कॅप्टन डॉ. सुजाता पाटील,सुभेदार मेजर बी.एम नाईक यांनी प्रभारी प्राचार्या डॉ. उषा पाटील व लेफ्टनंट कर्नल अमित कुमार यांच्या नेतृत्वाखाली केले.

यावेळी SP-9 मराठी माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक व म माजी X- सिनिअर अंडर ऑफिसर सागर पाटील, हवालदार सरोज,हवालदार कुमार दास यांच्यासह एन.सी.सी. छात्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.