HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

ऐन दिवाळीत सोन्या चांदीच्या दरात घसरण...

ऐन दिवाळीत सोन्या चांदीच्या दरात घसरण...

कोल्हापूर प्रतिनिधी :-

दिवाळीच्या सुरवातीलाच सोन्या चांदीच्या दरात घसरण... दिवाळीच्या मुहूर्तावर सोने चांदी खरेदी करण्यावर भर असतो . पण ऐन दिवाळी मध्ये सोन्याचांदीचे दर गगनाला भिडलेले असतात. पण यावर्षी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर म्हणावी लागेल. सोने-चांदी स्वस्त झाल्यामुळे सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 160 रुपयांची घसरण झाली असून दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली असताना, बाजारात ग्राहकांची लगबग पाहायला मिळत आहे.धनत्रयोदशीच्या आधीच सोने आणि चांदी स्वस्त झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीचे दर घटताना दिसत आहेत.

आज मुंबईमध्ये 24 कॅरेट सोनं 160 रुपयांनी स्वस्त झालं आहे. गुडरिटर्न वेबसाईट नुसार मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचा दर 61,200 रुपये आहे. मंगळवारी हा दर 61,360 रुपये होता. त्यासोबतच 22 कॅरेट सोनं 150 रुपयांनी स्वस्त झालं आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 56,250 वरून 56,100 रुपयांवर पोहोचला आहे. कोल्हापूर मध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 110 रुपयांनी स्वस्त झाला असून 61200 रुपये प्रतितोळा असणार आहे.

 याबरोबरच चांदीच्या दरातही घसरण झाली आहे.

आज चांदीचा दर 1000 रुपयांनी कमी झाला आहे. एक किलो चांदीचा दर 74,500 रुपयांवरून 73,500 रुपयांवर पोहोचला आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.