काँग्रेसचा विचार पोहोचवण्यासाठी आंदोलनातून कार्यकर्त्यांनी सक्रिय राहीलं पाहिजे : आ. सतेज पाटील

कोल्हापूर - आज प्रदेश काँग्रेस सरचिटणीस आणि कोल्हापूर शहर आणि जिल्हा निरीक्षक संजय बालुगडे यांच्या उपस्थितीत आणि आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक काँग्रेस कमिटी, कोल्हापूर येथे संपन्न झाली. तत्पुर्वी संजय बालुगडे यांची कोल्हापूर जिल्हा निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल आम्ही सतेज पाटील यांनी अभिनंदन करून स्वागत केले.
काँग्रेसचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आंदोलनातून कार्यकर्त्यांनी सक्रिय राहीलं पाहिजे. येत्या काळात संघटनात्मक ताकद दाखवण्यासाठी शिस्तबद्ध आणि नियोजनातून जनसंपर्काचं काम वाढवणं गरजेचं असल्याची भावना यावेळी आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केल्या.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी उपमहापौर विक्रम जरग, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, प्रतापसिंह जाधव, राहुल माने, राजू साबळे, तौफिक मुल्लाणी, अनुसूचित जाती सेलचे शहर प्रमुख दुर्वास कदम, काँग्रेस महिला आघाडीच्या सरलाताई पाटील, भारती पवार, गोकुळचे संचालक बयाजी शेळके, शेतकऱी संघाचे संचालक दत्ता वारके, माजी सैनिक संघाचे एन. एम. पाटील, काँग्रेसचे जिल्हा सचिव संजय पोवार- वाईकर, एनएसयूआयचे शहराध्यक्ष अक्षय शेळके, संजय पटकारे आदींसह जिल्हाभरातील काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.