कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक,शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणा

कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक,शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणा

कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक,शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणा


प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे


कोल्हापूर,केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गट खरी शिवसेना असल्याचा दावा करत धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला बहाल केलं. यावर कोल्हापुरातील ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला. यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण याबाबत घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे म्हणत निषेध व्यक्त केला आहे. यावेळी शहर प्रमुख सुनील मोदी, रविकिरण इंगवले, विजय देवणे, आणि शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते