HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

‘किंग’ शाहरुखचा मेट गालावर जलवा; काळ्या सूटमध्ये चाहत्यांना भुरळ

‘किंग’ शाहरुखचा मेट गालावर जलवा; काळ्या सूटमध्ये चाहत्यांना भुरळ

मुंबई : बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने अखेर मेट गाला 2025 मध्ये आपले पहिलंवहिलं पाऊल टाकलं आहे. जगभरातल्या फॅशनप्रेमींमध्ये उत्सुकता असलेल्या या कार्यक्रमात शाहरुखचा रेड कार्पेटवरचा लूक आणि स्टाईल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये शाहरुखने “मी शाहरुख” असं स्वतःचं परिचय दिला आहे, ज्यावर चाहत्यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या खास प्रसंगासाठी शाहरुखचा लूक प्रसिद्ध डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी तयार केला. काळ्या रंगाचा सूट, गळ्यात ‘K’ (किंग) लॉकेट असलेला नेकलेस, आणि वाघाच्या डोक्याचं कोरीव काम असलेली काठी  अशा हटके अंदाजात शाहरुख रेड कार्पेटवर अवतरला. त्याने एका मुलाखतीत सांगितलं की, “मी सुरुवातीला घाबरलो होतो, पण हे सगळं मी माझ्या मुलांसाठी करत आहे.”

शाहरुखने सब्यसाचीला ब्लॅक किंवा व्हाईट कपड्यांचीच मागणी केली होती, कारण त्याला लक्झरी आणि फॅन्सी लूक महत्वाचा वाटतो असं त्याने स्पष्ट केलं. कार्यक्रमानंतर दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “मी थोडा लाजाळू आहे, पण इथे येणं खूप छान वाटत आहे.” अँकरने विचारलेल्या विनोदी प्रश्नांनाही शाहरुखने सहजतेने उत्तर दिली.

शाहरुखसोबतच कियारा अडवाणी आणि पंजाबी स्टार दिलजीत दोसांझ यांचीही पहिली मेट गाला एंट्री झाली. प्रियांका चोप्रा तिचा पती निक जोनाससोबत ग्लॅमरस अंदाजात दिसली.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.