०५ मे ते ०९ मे या कालावधीत Tech - वारी चे जिल्हा परिषदेत ऑनलाईन प्रशिक्षण सत्र

०५ मे ते ०९ मे या कालावधीत Tech - वारी चे जिल्हा परिषदेत ऑनलाईन प्रशिक्षण सत्र

कोल्हापूर - महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची आधुनिक तंत्रज्ञानामध्ये क्षमता वृध्दींगत करण्यासाठी ०५ ते ०९ मे या कालावधीत Tech - वारी या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

कार्यक्रमांचे स्वरूप खालीलप्रमाणे - 

१. कृत्रिम बुध्दिमत्ता, ब्लॉकचेन, इंटरनेट ऑफ थिंग्ज, सायबर सुरक्षा इ. विषयांवर तज्ञांची सत्रे

२. वैयक्तिक व प्रशासकीय कार्यक्षमता विकसित करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाबाबतची कार्यशाळा

३. तणाव व्यवस्थाप, निरोगी जीवन पध्दती, ध्यानधारणा इ. विचारमंथन सत्रे

सदर प्रशिक्षणाचे ऑनलाईन सत्र हे जिल्हा परिषदेच्या ४ थ्या मजल्यावरील हॉलमध्ये आयोजित करण्यात आले होते. आजच्या पहिल्या सत्रात प्रभु गौर गोपालदास यांचे प्रभावी व तणावमुक्त जीवन या विषयावर व्याख्यान झाले. दुपारी २.०० ते ३.०० या सत्रात देबजानी घोष, भारत सरकार नीती आयोग यांचे विकसित महाराष्ट्रासाठी फ्रंटीयर तंत्रज्ञान या विषयांवर व दु.३.०० ते ४.०० या सत्रात मंदार कुलकर्णी यांचे शासकीय कामकाज प्रभावीपणे कसे करावे या विषयांवर तर दु. ४.०० ते सायंकाळी ५.०० या सत्रात अभिषेक सिंग, सीईओ, एआय इंडीया मिशन आणि अतिरिक्त सचिव, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, दिल्ली, भारत यांचे कृत्रिम बुध्दिमत्ता या विषयांवर व्याख्यान झाले. 

सदर ऑनलाईन प्रशिक्षण सत्रास जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील तसेच सर्व पंचायत समितीमधील कर्मचारी यांनी हजर राहून प्रशिक्षण घेतले. 

०६ ते ०९ मे या कालावधीत सकाळी ११ ते ४ या वेळेत विविध विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सदरच्या प्रशिक्षण सत्रांना सर्व कर्मचारी उपस्थित राहून प्रशिक्षण घेणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनूसार मनिषा देसाई, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन यांनी प्रशिक्षणाची ऑनलाईन कार्यक्रमाची सुरुवात करुन उपस्थित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाबांबत आवश्यक माहिती दिली व पुढील सर्व प्रशिक्षण सत्रांना उपस्थित रहाण्याच्या सूचना देऊन शासनाचा हा उपक्रम चांगल्या प्रकारे पार पाडावा असे आवाहन केले.