केंद्रात मंत्रिपद नको, उपमुख्यमंत्रीपदही नको पण... एकनाथ शिंदेंची लेकासाठी 'ही' मागणी

केंद्रात मंत्रिपद नको, उपमुख्यमंत्रीपदही नको पण... एकनाथ शिंदेंची लेकासाठी 'ही' मागणी

मुंबई: विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा विजय प्राप्त झाला. यानंतर आता महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे ती आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? सुरुवातीला शिंदे गट मुख्यमंत्री पदासाठी असून बसला होता. पण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांचा हा दबाव झुगारून देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील असा निरोप धाडला. यांनतर एकनाथ शिंदे यांनी मोदी आणि अमित शाह जो काही निर्णय घेतील तो महायुती म्हणून शिवसेनेला मान्य असेल असे सांगितले. 

एकूणच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याचं स्पष्ट झालंय. भाजपकडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या बदल्यात केंद्रात मोठं मंत्रिपद किंवा उपमुख्यमंत्रीपद  देण्याची तयारी दर्शवल्याचीही बातमी समोर येत आहे. परंतु एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही ऑफर्स नाकारल्या आहेत. मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात महायुतीचे संयोजन पद आणि मुलगा खासदार  श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद द्यावे अशी मागणी केल्याची बातमीही समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या या मागणीमुळे भाजपसमोर नवा पेच निर्माण झाला आहे. आता भाजपचे वरिष्ठ याबाबत काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.