चंद्रशेखर राव यांना मोठा धक्का! बीआरएस पक्षाचा पवार गटात विलीन होण्याचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भारत राष्ट्र समिती (BRS) पक्षाचा संपूर्ण गट शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पवार गटात विलीन होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि BRS पक्षाचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांना हा मोठा धक्का मानला जातो आहे.
राज्यातील BRS पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी सोमवारी शरद पवार यांची भेट घेतली, ज्यात पक्षाच्या विलिनीकरणावर चर्चा झाली. या बैठकीत अंतिम निर्णय घेतला गेला असून, 6 तारखेला पुण्यात एक कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमात BRSचे प्रमुख पदाधिकारी शरद पवार यांच्या उपस्थितीत अधिकृतरित्या पवार गटात प्रवेश करतील.
हा घटनाक्रम महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड मानला जात असून, आगामी विधानसभा निवडणुकीत याचा प्रभाव पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. BRS पक्षाने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आपली पकड बनवली होती, मात्र या विलिनीकरणामुळे त्यांचे कार्यकर्ते शरद पवार गटात सामील होतील.