केआयटीचा 'बेस्ट परफॉर्मिंग इन्स्टिट्यूट’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान
कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयाला ‘एज्यूस्कील’ यांनी ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) यांच्याशी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘एज्यूस्कील कनेक्ट -२४’ ‘नेक्स्ट जनरेशन स्किल’ आणि ‘एच.आर.समिट २४’ मध्ये बेस्ट परफॉर्मिंग संस्था-२४ (पश्चिम विभाग) या सह अन्य राष्ट्रीय स्तरावरील पाच पुरस्काराने सन्मानित केले आहे. हा कार्यक्रम २७-२८ सप्टेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर नवी दिल्ली येथे संपन्न झाला.
गेल्या अनेक वर्षापासून केआयटीने राखलेला शैक्षणिक दर्जा,विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधून मिळालेली कामाची संधी, विद्यार्थी तसेच प्राध्यापकांचे संशोधनात्मक कार्य ,उच्च शिक्षणासाठी भारतात भारताबाहेर राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थांमधून विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांची झालेली निवड, उद्योजकता विषयात निर्माण झालेली जागरूकता व त्यातून तयार होत असलेले नवनवीन स्टार्टअप्स, दर्जेदार उद्योग समूहातून विद्यार्थ्यांना मिळत असलेली इंटर्नशिप ची संधी, विविध उद्योग समूहांच्या सोबत केआयटी चे झालेले शैक्षणिक करार यामुळेच केआयटी चे यावर्षी १०० % ऍडमिशन पूर्ण झाल्या आहेत.या सर्व स्तरावरील प्राध्यापक ,विद्यार्थ्यांच्या यशस्वी योगादानाचा मुळे राष्ट्रीय पुरस्कारांना गवसणी घालणे शक्य झाल्याचे मत संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी व्यक्त केले.
केआयटी चे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले " केआयटी साठी हा खूप मोठा आणि अभिमानाचा क्षण आहे.एआयसीटीईच्या सहकार्याने सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये प्राध्यापकांनी सायबर सुरक्षा, क्लाऊड कम्प्युटिंग,आरपीए,डेटा अनालिसिस यासारख्या आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत.दोन हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी व्हर्चुअल इंटर्नशिप पूर्ण केलेली आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून ५० हून अधिक विद्यार्थ्यांना एमडॉक्स,एक्सचेंजर, वंडरबोर्त्स, टीसीएस निंजा या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांमध्ये स्थान मिळाले आहे. बेस्ट परफॉर्मिंग इन्स्टिट्यूट या पुरस्कारासोबत डिरेक्टर एक्सलन्स अवॉर्ड, बेस्ट परफॉर्मिंग सेंटर ऑफ एक्सलन्स सीओई कोऑर्डिनेटर डॉ.ममता कळस, राष्ट्रीय स्तरावरील रँक ४६ , वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, टॅलेंट कनेक्टेड पुरस्कार डॉ. अमित सरकार. या अन्य ५ पुरस्काराने कॉलेजला सन्मानित करण्यात आले आहे.
२७ सप्टेंबर २४ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात एआयसीटीई चे अध्यक्ष टी.जी. सितारामन, एआयसीटीई सदस्य सचिव श्री.राजीव कुमार, प्रा. के. के. अग्रवाल, माजी अध्यक्ष एआयसीटीई सुभाजित जगदेव संस्थापक अध्यक्ष एज्यूस्कील यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष श्री.साजिद हुदली,उपाध्यक्ष श्री.सचिन मेनन, सचिव श्री.दीपक चौगुले अन्य सर्व विश्वस्त यांच्या सततच्या प्रोत्साहनामुळे,मार्गदर्शनामुळे व सर्व प्रकारच्या सहकार्यामुळे केआयटीला असे उज्ज्वल यश मिळत आहे. राष्ट्रीय स्तरावरील या विविध पुरस्काराबद्दल सर्व कर्मचारी ,संबंधित प्राध्यापकांचे सर्व विश्वस्तांनी अभिनंदन केले आहे. संगणक विभागाच्या डॉ.ममता कळस यांनी या ‘एज्यूस्कील’ अंतर्गत विविध परीक्षांचे समन्वयक म्ह्नणून काम पाहिले.