पुढील पाच वर्षात आणखी जोमाने काम करणार : आमदार जयश्री जाधव

पुढील पाच वर्षात आणखी जोमाने काम करणार : आमदार जयश्री जाधव

कोल्हापूर : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार हे निश्चित आहे. गेल्या अडीच वर्षातील विकास कामांचा कोटा भरून काढण्यासाठी आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, पुढील पाच वर्षात आणखी जोमाने काम करण्यास कटिबध्द असल्याचे आमदार जयश्री जाधव यांनी सांगितले.

प्रभाग क्रमांक ४४ व ४५ मधील स्थानिक आमदार निधीतील ५४.४५ लाख रुपयांच्या विकासकामाच्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. साठमारी जवळील भैरवनाथ मंदिर चौकात विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. 

आमदार जाधव म्हणाल्या, कोल्हापुरातील स्वाभिमानी जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आमदार म्हणून अधिवेशन काळात सभागृहात व सभागृहाच्या बाहेर शहराच्या विविध समस्यांवर आवाज उठवला आहे. शहराच्या विविध विकास कामांसाठी निधी मिळावा म्हणून पाठपुरावा केला. मात्र विरोधातील आमदार म्हणून विकासनिधीमध्ये मला डावलले. परंतु आगामी काळात राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीची सत्ता येणार हे निश्चित आहे. यावेळी शासनाकडून जास्तीत जास्त निधी आणून कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणखी जोमाने काम करू आणि दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांचे कोल्हापूरच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करू.

यावेळी कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन (केएसए) च्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बाळासाहेब नचिते यांचा सत्कार आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी पीटीएमचे अध्यक्ष राजू ठोंबरे, केएसएचे सचिव माणिक मंडलिक यांची भाषणे झाली. आनंदराव पायमल, तुकाराम माळी तालीम मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव पोवार, अभिषेक देवणे, बाळासाहेब चौगुले, विकास पायमल, प्रशांत गवळी, प्रभाकर पाटील, दीपक थोरात, धवल अवटी, विलास मेथे, राजेश बणदार, संदीप चौगुले, उमेश पाडळकर, उदय शेजाळे, अक्षय शेळके, संदीप पोवार, सुनिल बोंद्रे यांच्यासहभागातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव यांच्या स्थानिक आमदार निधीतील ५४.४५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये कैलासगडची स्वारी अंतर्गत सुनील बोंद्रे घर ते गोखले कॉलेज चौक रस्ता करणे - १८,४७,००० रुपये, मंगेशकरनगर अंतर्गत प्यासा हॉटेल ते महालक्ष्मी बेकर्स गटर करणे - २,६०,००० रुपये, मंगेशकरनगर अंतर्गत प्यासा हॉटेल ते अमर तरुण मंडळ रस्ता करणे - ४,८२,००० रुपये, गोखले कॉलेज चौक येथे हायमास्ट बसवणे - ५,००,००० रुपये, मंगेशकरनगर अंतर्गत तिवारी घर ते महालक्ष्मी सर्व्हिसींग सेंटर रस्ता करणे - १२,९२,००० रुपये, कैलासगडची स्वारी अंतर्गत पाटाकडील तालीम ते शितल माने घर रस्ता डांबरीकरण करणे - १०,६४,००० रुपये ही कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.