कोरे अभियांत्रिकीत (स्वायत्त) प्रथम वर्ष एमसीए साठी प्रवेशाचा ओघ
कोल्हापूर (प्रतिनिधी) : संचालक महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण संचालनालय, यांच्याकडून प्रथम वर्ष एमसीए साठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे रिपोर्टिंग सुरु झाले. तात्यासाहेब कोरे स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयाने याच वर्षी सुरु केलेल्या एमसीए अभ्यासक्रमास प्रथम वर्ष प्रवेशात ९०% विद्यार्थ्याची पसंती मिळवुन पालक आणि विद्यार्थ्यांची विश्वासार्हता सिद्ध केली आहे.
प्रवेशाच्या पहिल्या दिवशी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी महाविद्यालय परिसरात गर्दी केली होती प्राची दिनकर पाटील, सीईटी गुण ९३.८२, रा. कवठेमहांकाळ, विद्यार्थिनीचे व त्यांच्या पालकांचे विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ . व्ही. व्ही. कारजिन्नी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी , अधिष्ठाता, डॉ. एस. एम. पिसे, प्र. प्राचार्य, डॉ. डी. एन. माने सोबत ऍडमिशन इन्चार्ज डॉ. ए. व्ही. पाटील, प्रा. गणेश कांबळे इतर पदाधिकारी उपस्थित होते. महाविद्यालयास वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष, डॉ. विनयरावजी कोरे यांचे मार्गदर्शन व पाठबळ नेहमी मिळत असते.
एमसीए (मास्टर ऑफ कॉम्प्युटर अप्लिकेशन्स) प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. संगणक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगतीमुळे आणि डिजिटलायझेशनच्या वाढत्या मागणीमुळे एमसीए अभ्यासक्रमाकडे विद्यार्थी अधिक आकर्षित होत आहेत. या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना संगणक प्रोग्रामिंग, सॉफ्टवेअर विकास, डेटा व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रांमध्ये सखोल ज्ञान मिळते, ज्यामुळे त्यांना विविध तंत्रज्ञान क्षेत्रांत रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होतात.
नेहमीच गुणवत्ता पूर्ण शिक्षण व दर्जेदार सुविधा देण्यावर महाविद्यालयाचा नेहमीच भर असतो.सुसज्ज ग्रंथालय,अत्याधुनिक वसतिगृहे ,दळणवळण सुविधा ,उच्चांकि प्लेसमेंट, बी.टेक ओनर्स कोर्सेस, नामांकित कंपन्यांशी सामंजस्य करार, स्पर्धा परीक्षा केंद्र, इनडोअर स्टेडियम, स्विमिंग पूल, नव्यानेच सुरु झालेले वारणा विज्ञान केंद्र आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निरनिराळे कार्यक्रम महाविद्यालयात सातत्याने आयोजित केले जातात.