शाळांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे तसेच इतर बाबींबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून सक्त सूचना

शाळांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे तसेच इतर बाबींबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून सक्त सूचना

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणा बरोबरच त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही अनुचित घटना घडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे या बाबीची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी आढावा बैठकीत शिक्षण विभागाला सक्त सूचना दिल्या त्याचबरोबर तक्रारपेटी बसविणे व सखी-सावित्री समिती गठीत करणेबाबत शाळा मुख्याध्यापकांनी कार्यवाही करणेबाबत आदेश दिला. 

  या झालेल्या बैठकीत सर्व शाळांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसविणे अधिक पट असणा-या जि. प सर्व शाळांमध्ये तसेच खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये व शाळा परिसरात सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविणे बाबत संबंधितांना सुचना देण्यात आल्या.

अधिक पटाच्या जि.प. शाळांमध्ये तसेच उर्वरित सर्व शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही. बसविणेकामी येणारा खर्च हा देण्यात येणाऱ्या 4% अनुदान, समग्र शिक्षा शाळा अनुदान, तसेच सी.एस.आर. व लोकसहभाग इ. मधून करणेत यावा. शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविलेनंतर आवश्यकतेनुसार ठराविक अंतराने त्याचे फुटेज तपासणे काही आक्षेपार्ह बाबी आढळून आलेस त्यावर कार्यवाही करणेची जबाबदारी शाळा मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीची राहणार. फुटेजमध्ये काही आक्षेपार्ह बाबी आढळलेस याबाबत स्थानिक पोलिस प्रशासनाशी संपर्क साधून योग्य ही कार्यवाही करावी. तसेच केलेल्या कार्यवाहीचा प्रत्येक 6 महिन्यातून आढावा घेवून एकत्रित माहितीसह अहवाल संबंधित कार्यालयास सादर करावा.

       सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्य. व उच्च माध्यमिक शाळांमध्ये तक्रारपेटी शाळेच्या दर्शनी भागात नजरेस येईल अशारितीने पुरेशा मापाची व सुरक्षित तक्रारपेटी लावण्यात यावी.प्रत्येक आठवडयाच्या शेवटच्या दिवशी पोलीस पाटील, पालक/विद्यार्थी यांच्या समक्ष तक्रारपेटी महिला कर्मचारी / महिला पालक यांच्या समोर मुख्याध्यापकांनी उघडण्यात यावी व त्याचे व्हिडीओ शूटींग करणेत यावे. गंभीर स्वरूपाच्या तक्रारीबाबत पोलीस यंत्रणेचे सहाय्य आवश्यक असल्यास घ्यावे. 

    याबाबत केंद्रप्रमुखांनी केंद्रातील 100% शाळांची व्हिडीओ शूटींगची पहाणी करावी. विस्तार अधिकारी (शिक्षण) यांनी रँडमली 10 शाळांची व्हिडीओ शूटींगची पहाणी करावी. तसेच गटशिक्षणाधिकारी या रँडमली 5 शाळांची व्हिडीओ शूटींगची पहाणी करावी.

        सर्व शाळांमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समता मुलक वातावरण निर्मितीसाठी सखी - सावित्री समिती गठण करणे बंधनकारक आहे. सदर समितीमध्ये केंद्रप्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली शासननिर्णय नुसार केंद्रस्तरावर आणि तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शासन निर्णयानुसार समिती गठीत करावी. 

   शाळास्तर, केंद्रस्तर तसेच तालुका / शहर साधन केंद्र अंतर्गत सखी सावित्री समितीची कर्तव्ये / कार्ये पूर्ण करणे बंधनकारक आहे. विद्यार्थी सुरक्षा संबंधी काळजी घेणे तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणे. आदीं बाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस व प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.