कोल्हापुरात वीजबिलांची 20 कोटींची थकबाकी...

कोल्हापुरात वीजबिलांची 20 कोटींची थकबाकी...

महावितरणने गेल्या 25 दिवसांत पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक 20 हजार 328 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामध्ये सांगलीतील -2776, पुणे जिल्हा- 11,182 कोल्हापूर- 2094 आणि सातारा- 1823, सोलापूर- 6008, अश्या एकूण वीस हजारांहून अधिक थकबाकीदारांचा समावेश आहे. घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील 15 लाख 74 हजार 580 वीजग्राहकांकडे 310 कोटी 17 लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. यात सर्वाधिक घरगुती 218 कोटी 30 लाख तसेच वाणिज्यिक 62 कोटी 9 लाख, तर औद्योगिक 29 कोटी 78 लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे महावितरणकडून वसुली मोहीम राबविण्यात येत असून, थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे.

कोल्हापूरातील ग्राहकांकडे 20 कोटी 33 लाख आणि सांगली जिल्ह्यात 20 कोटी 73 लाख रुपयांची थकबाकी आहे. वीजग्राहकांसाठी महावितरणचे अधिकृत वीज बिल भरणा केंद्र शनिवारी व रविवारी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहे.