HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश - अमल महाडिकांची मागणी पूर्ण...

             करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येत असतात मात्र दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमधूनही कोल्हापुरातील रस्त्यांच्या दर्जाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. यावर उपाय म्हणून कोल्हापूर शहरात प्रवेश करणारे सर्व रस्ते सार्वजनिक बांधकाम खात्याने ताब्यात घेऊन त्या रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी मा. आम. अमल महाडिक यांनी बांधकाम मंत्री यांना केली होती.

              त्यावेळी मंत्री चव्हाण यांनी याविषयी अनुकूलता दर्शवली होती. त्यानंतर महाडिक यांनी महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग स्तरावर पाठपुरावा करून ही मागणी लावून धरली होती. यासंदर्भात तातडीने बैठक घेऊन चव्हाण यांनी प्रस्तावित तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात या बाबीचा समावेश करून सुधारित आराखडा 13 फेब्रुवारी पूर्वी आपल्या विभागाकडे सादर करावा अशा सूचना केल्या. मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय घेऊन निधी वर्ग केला जाईल असे आश्वासन चव्हाण यांनी महाडिक यांना दिले. 

               तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश केल्यामुळे कोल्हापूर शहरात प्रवेश करणारे रस्ते चांगल्या दर्जाचे बनण्यास मदत होईल तसेच महापालिकेवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही व लवकरच याबाबत निर्णय होऊन चांगल्या दर्जाचे रस्ते कोल्हापूरकरांना मिळतील असा विश्वास माजी आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केला.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.