भोई समाजाचे नवीन बांधण्यात आलेल्या समाजभावनाचे उद्घाटन

भोई समाजाचे नवीन बांधण्यात आलेल्या समाजभावनाचे उद्घाटन

कोल्हापूर प्रतिनिधी : जिल्ह्यातील भोई समाजाचे नवीन बांधण्यात आलेल्या समाजभावनाचे उद्घाटन आज  तोरसकर चौक येथे पार पडला. 

सदर कार्यक्रमस खासदार शाहू महाराज, माजी खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे, आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार जयश्री जाधव, नगरसेवक धनंजय सावंत, नंदू मोरे, तेजस्वीनी घोरपडे, इब्राहिम मुल्ला, अध्यक्ष नामदेव तिकोणे, उपाध्यक्ष वर्ष मुळे, सेक्रेटरी धोंडीराम कांबळे, संचालक गणपतराव भोई (नलवडे) सुभाष आयरे, राजेंद्र ठोंबरे, सुभाष आयरे, सुनील घाग, संगीता नलवडे, जयसिंग झिटे, सोपान कनोजे,उत्तम भोई, व समस्त भोई बांधव हजर होते.

शाहू महाराज यांनी भोई समाज चे कार्य शिवाजी महाराज पासून आहे. शिवाजी महाराज ज्या वेळी पन्हाळा वरुन विशाळगड ला गेले त्या वेळी त्याना विशाळगड वर पोहोचवण्याचे काम भोई समाज यानी केले आहे. तसेच भोई समाजाचे मुले, मुली शिकली पाहिजे असे भाषण केले. भोई समाज वर अन्याय झाला की मी तुमच्या बरोबर आहे. अशी ग्वाही संभाजी राजे यांनी यावेळी बोलताना दिली.  आमदार राजेश क्षीरसागर यांनी भोई समाज च्या तिसरा मजला साठी योग्य ती आर्थिक मदत करतो. तसेच भोई समाज चे शासन कडे कोणतीही काम असेल तर ते मी करुन देतो असे सांगितले भोई समाज चे नेते प्रकाश लोणारे यानी समाज च्या अडचणी सागितले जयश्री जाधव माजी आमदार यांनी भोई समाज ला योग्य वेळी मदत केली आहे. आभार धोंडीराम कांबळे यांनी केले.