विशाळगडावर उघड्यावर दारू पिणाऱ्यास अटक

विशाळगडावर उघड्यावर दारू पिणाऱ्यास अटक

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते 

ऐतिहासिक किल्ले विशाळगडावर उघड्यावर दारू पिणाऱ्यास आणि दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यास अश्या दोन घटनेत ३ जणांना अटक करण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार 8 मार्च 2023 रोजी पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे, पोलीस अंमलदार शहाजी भोसले, महेश भारमल या गस्तीपथकाला नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्लम अल्लाबक्ष बळगार वय वर्ष 29, हा उघड्यावर सार्वजनिक ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्रात दारू पीत असताना आढळून आल्याने त्याला पकडून त्यास न्यायालयात हजर केले असता, दोन हजार रुपये दंड/पंधरा दिवस साधी कैद शिक्षा सुनावण्यात आली.

 दुसऱ्या गस्तीपथकातील पोलीस सुरेश पाटील, पोलीस शिवाजी पाटील यांनी दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या अजय वसंत शिंदे वय वर्ष 23, अशोक कोंडीबा कांबळे वय वर्षे 46 या इसमास अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दहा हजार रुपये दंड/ दंड न भरल्यास 6 महिन्याची साधी कैद अशी शिक्षा सुनावली. या घटनेमुळे शाहुवाडी पोलिसांची कार्य तत्परता व सतर्कता यामुळे, समाजातील घडणाऱ्या प्रत्येक घटनेकडे पोलिसांचे कटाक्षाने लक्ष असल्याचे निदर्शनास येते. शाहूवाडीचे पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस दल समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचल्याचे जाणवते.

यामुळे भागातील सर्व नागरिकांकडून पोलीस दलाचे अभिनंदन करण्यात येत आहे.