अंबाबाईच्या मुळ मूर्तीचे दर्शन भाविकांना घेता येणार नाही...

अंबाबाईच्या मुळ मूर्तीचे दर्शन  भाविकांना घेता येणार नाही...

श्री अंबाबाईची मूर्ती सुस्थितीत राखण्यासाठी भारतीय पुरातत्त्व विभागाकडून उद्यापासून मूर्तीसंवर्धन प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यानुसार पुरातत्त्व विभागाकडून श्री अंबाबाईच्या मूर्तीची पाहणी करण्यात आली त्यानंतर रविवारी व सोमवारी मूर्तीची संवर्धन प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे याप्रक्रियेमुळे देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन भाविकांना घेता येणार नाही. या कालावधीत भाविकांना उत्सवमूर्ती व कलशाचे दर्शन या पितळी उंबऱ्याच्या बाहेरून घ्यावे लागणार आहे.  

करवीर निवासिनी अंबाबाईची मूर्ती सुस्थितीत राहण्यासाठी जिल्हाधिकारी येडगे यांनी मूर्तीची पाहणी करण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला कळविले होते. याबाबत मूर्तीची संवर्धन प्रक्रिया व्हावी,असा अहवाल पुरातत्व विभागाचे महासंचालक यांनी २८ मार्चला कळवले होते. त्यानुसार ही संवर्धन प्रक्रिया रविवारी व सोमवार होणार आहे. त्यामुळे भाविकांना करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेता येणार नाहीये.