कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट

कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट
जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर होण्याची भीती

कोल्हापूर / माझा महाराष्ट्र

हवामान विभागाकडून आज कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं ही पूरस्थिती गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाकडून अधिक सतर्कता बाळगण्यात येत असून नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. त्यातच हवामान विभागाकडून जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आल्याने नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी तसंच पूराचा फटका बसणार्‍या भागातील लोकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.