केंद्र शाळा तारळे खुर्द येथे शाळा पूर्व तयारी मेळावा उत्साहात संपन्न.

केंद्र शाळा तारळे खुर्द येथे शाळा पूर्व तयारी मेळावा उत्साहात संपन्न.

राधानगरी प्रतिनिधी:निवास हुजरे

कें

द्र शाळा तारळे खुर्द ता. राधानगरी शाळेमध्ये सन 2023-2024 चा शाळापूर्व तयारी मेळावा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.इयत्ता 1 ली मध्ये दाखल होणाऱ्या मुलांना वाजत गाजत शाळेत आणणेत आले.तसेच त्यांचे औक्षण करून त्यांना गोड खाऊ वाटप करण्यात आला,शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष मा. नेताजी चौगले यांनी इयत्ता 1ली मध्ये दाखल झालेल्या व इयत्ता 7 वी च्या सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटप केल्या.या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नेताजी चौगले,उपाध्यक्ष सदाशिव भोसले, सदस्या ज्योती मोहिते,वंदना सावंत,राजश्री पाटील,विद्या पाटील तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस,इयत्ता 1ली तील मातापालक श्रीमती जयलक्ष्मी नवाळे मॅडम, सारिका पाटील मॅडम,स्मिता पाटील,उषा पाटील मॅडम उपस्थित होत्या.प्रास्ताविक केंद्र शाळा तारळे खुर्दचे विषय शिक्षक श्री. संजय जाधव सर यांनी केले, आभार श्री. प्रकाश पोवार सर यांनी मानले.