कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या अंबादास दानवे यांनी घेतली आमदार सतेज पाटील यांची सदिच्छा भेट

कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या अंबादास दानवे यांनी घेतली आमदार सतेज पाटील यांची सदिच्छा भेट

           विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आज गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. महालक्ष्मी दर्शनानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे त्यांनी आढावा बैठक घेतली. यानंतर दानवे यांनी विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची गुरुवारी अजिंक्यतारा कार्यालय येथे सदिच्छा भेट घेतली. 

         आमदार सतेज पाटील यांनी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची मूर्ती भेट देऊन विरोधी पक्षनेते दानवे यांचे स्वागत केले. दोघांनी एकत्रित चहा घेत जिल्ह्यातील व राज्यातील राजकीय विषय व विविध विषयांवर चर्चा केली.

          यावेळी आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार सुजित मिणचेकर, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, सुनिल मोदी, रविकिरण इंगवले, गोकुळचे संचालक बाबासो चौगले आदी उपस्थित होते.