'व्हॉइस कल्चर' वर आजपासून विद्यापीठात दोन दिवशीय कार्यशाळा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन आणि दूर शिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. 14 आणि शनिवार, दि. 15 फेब्रुवारी रोजी दोन दिवशीय व्हाईस कल्चर कार्यशाळा आयोजित केली आहे. पीएम उषा योजनेअंतर्गत पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अभ्यासनात ही कार्यशाळा होत आहे.
शुक्रवार दि. 14 रोजी सातारा येथील ख्यातनाम उच्चारशास्त्र तज्ज्ञ तुषार भद्रे तर दि. 15 रोजी पुणे येथील इएमएमआरसीचे सहयोगी निर्माते मिलिंद पाटील यांचे मार्गदर्शन होणार आहे. कार्यशाळा सकाळी 11 ते सायंकाळी पाच या वेळेत होणार असून सर्वांसाठी ती खुली आहे. या कार्यशाळेला उपस्थित राहावे, असे आवाहन पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव आणि दूर शिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे प्र- संचालक डॉ. कृष्णा पाटील यांनी केले आहे.