कार्यकर्त्यांनी मंत्रालयात प्रतिष्ठा मिरविण्यासाठी नाही, जनतेची कामे घेऊन यावे : मुख्यमंत्री फडणवीस

कार्यकर्त्यांनी मंत्रालयात प्रतिष्ठा मिरविण्यासाठी  नाही, जनतेची कामे घेऊन यावे : मुख्यमंत्री फडणवीस

शिर्डी : ‘राज्य सरकारने जसा १०० दिवसांचा कार्यक्रम घेतला आहे, तसाच कार्यक्रम पक्षाने कार्यकर्त्यांसाठी दिला पाहिजे. कार्यकर्त्यांनी मंत्रालयात प्रतिष्ठा मिरविण्यासाठी येण्यापेक्षा जनतेची कामे घेऊन यावे. याच कामांच्या जोरावर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुन्हा एकदा महाविजय मिळवायचा आहे,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

भाजपचे प्रदेश अधिवेशन रविवारी शिर्डीत झाले. यावेळी ते बोलत होते.‘आपले सरकार आले म्हणून आता सुखासीन व्हायचे नाही. पराभव झाला तरीही अराजकतावादी शक्तींच्या कारवाया थांबलेल्या नाहीत. बांगलादेशी घुसखोरी वाढली आहे. त्यांना बाहेर काढावे लागेल. अराजकतावादी शक्ती राज्यातील सामाजिक एकोप्याची वीण खराब करीत आहेत. काही घटना गंभीर असतात, त्यांचे पडसाद नैसर्गिकरीत्या उमटतात, ते सहाजिकच असते. मात्र, त्याआडून अराजकतावादी वातावरण बिघडू पाहत आहेत,’ असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.