राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा 26 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर शहर व ग्रामीण जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने 26 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पक्षाचे शहर कार्यालय शिवाजी स्टेडियम येथे पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी सरचिटणीस व कामगार नेते चंद्रकांत वाकळे यांच्या हस्ते पक्षाचे झेंडावंदन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पक्षाचे सहकार विभागाचे अध्यक्ष राजाराम पाटोळे हे होते. स्वागत व प्रस्तावना हिदायत मणेर यांनी केले.
यावेळी चंद्रकांत वाकळे म्हणाले, " येणाऱ्या निवडणुका आपल्याला आपल्याच कार्यकर्त्यांसाठी लढायच्या आहेत. महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना व मित्र पक्षच्या वतीने एकत्रित येऊन एक दिलाने या निवडणूकीला सामोरे जायचं आहे. यावेळी आपण सर्वांनी मोठ्या कष्टाने व मेहनतीने ही निवडणूक जिंकायची आहे, " असेही वाकळे यांनी सांगितले. यावेळी विविध कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे आभार उद्योग व व्यापार विभाग अध्यक्ष रामराजे बदाले यांनी मानले. या कार्यक्रमाचे आयोजन सेवादलचे अध्यक्ष महादेव पाटील यांनी चांगल्या प्रकारे केले होते.
यावेळी संजय शिंदे, आप्पा साहेब हजारे, श्रीकांत पाटील, जयकुमार शिंदे, शशिकांत कदम, फिरोज खान उस्ताद, रवी कांबळे, तानाजी नंदीवाले, राजेंद्र पाटील राजाराम सुतार, शिवाजी पोळ, आनंदराव पोलादे, गणेश जाधव, नागेश जाधव, राजवर्धन यादव, दिनकर कांबळे, अनिता टीपुगडे, अविनाश माने, मुसाबाई कुलकर्णी, रियाज कागदी, सुनील बागवान, राजू जमादार, सलीम मुल्ला, चंद्रकांत सूर्यवंशी, सुनील सावर्डेकर, फिरोज सरगुर, सुनील सावर्डेकर यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.