खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून पंतप्रधानांचे अभिनंदन आणि आभार

खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून पंतप्रधानांचे अभिनंदन आणि आभार

कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात सुरू केलेल्या टेलीमेडिसिन ऍपमुळे देशाच्या १४ कोटी १७ लाख नागरिकांपर्यंत पोहचवलेल्या आरोग्य सेवेसाठी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून पंतप्रधानांचे अभिनंदन आणि आभार मानले.

पावसाळी अधिवेशनत आज टेलीमेडिसिन ऍप्लिकेशनच्या वापरासंदर्भात खासदार धनंजय महाडिक यांनी प्रश्‍न उपस्थित केला. कोरोना काळात ग्रामीण भागातील वाड्यावस्त्यांपर्यंत वैद्यकीय मार्गदर्शन आणि उपचाराची सुविधा मिळण्यासाठी सुरू केलेले हे ऍप्लिकेशन अजूनही कार्यरत आहे का?, अशी विचारणा खासदार महाडिक यांनी केली. त्यावर हे ऍप्लिकेशन अजूनही कार्यरत असून, ग्रामीण भागातील लोकांनी या ऍप्लिकेशनद्वारे मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवेचा लाभ घेतल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री एस.पी.सिंह बघेल यांनी सांगितले. तसेच ही जगातील सर्वात मोठी आरोग्य सेवा ठरल्याचेही त्यांनी नमुद केले. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवी यांचे खासदार धनंजय महाडिक यांनी अभिनंदन केले.